MSSC Scheme: फक्त २ वर्षात व्हाल मालामाल! २ महिन्यांत ५ लाख महिलांनी घेतला ' या ' सरकारी योजनेचा लाभ

Mahila Samman Savings Certificate Scheme: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिला वर्गामध्ये प्रचंड चर्चेत आहे. या योजनेची सुरुवात झाल्यापासून दोन महिन्यांतच ५ लाख महिलांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत.
Ladki Bahin Yojana Savings
Ladki Bahin YojanaSAAM TV
Published On

सरकारने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. ही योजना महिलावर्गामध्ये प्रचंड चर्चेत आहे आणि ती योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. या योजनेची सुरुवात झाल्यापासून दोन महिन्यांतच ५ लाख महिलांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत आहे. तर कमीत कमी १००० रूपये गुंतवू शकता. तसेच २ वर्षांनी गुंतवलेली रक्कम व्याजासह काढू देखील शकता.

या योजनेद्वारे कमी गुंतवणुकीत व्याजाच्या स्वरूपात उत्तम परतावा मिळत असल्यामुळे महिलावर्ग आवर्जून या योजनेत पैसे गुंतवत आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेत आहेत. जर आपल्याला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर, आपण आपल्या नावे खाते उघडू शकता. आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये खाते उघडू शकता.

Ladki Bahin Yojana Savings
Gold Purity Check: सोन्याचे दागिने खरे की बनावट ओळखण्याचा सोपा मार्ग; एक ॲप करेल लाखमोलाचं काम, जाणून घ्या

खाते उघडण्यासाठी आपल्याला विशेष काही कागदपत्रांची आवश्यकता नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि काही रंगीत फोटो इत्यादी केवासी कागदपत्रांची आवश्यकता आहे. या कागदपत्रांच्या आधारावर आपण खाते उघडू शकता. विशेष म्हणजे, १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पैसे काढण्याची परवानगी मिळते. आपण ४० टक्के रक्कम काढू शकता.

Ladki Bahin Yojana Savings
Yavatmal Crime: धक्कादायक! आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; १६ वर्षांची मुलगी राहिली गरोदर

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत फक्त महिलाच खाती उघडू शकतात. अल्पवयीन मुलीचे पालक तिच्या नावाने खाते उघडू शकतात. द इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यावर ७.५ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. त्यामुळे योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com