Landslide In Malshej Ghat: ब्रेकिंग! माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

Landslide In Malshej Ghat On Kalyan Nagar Highway: माळशेज घाटामध्ये दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये दोन ठार तर तीन जखमी झालेत.
 माळशेज घाटामध्ये दरड कोसळली
Landslide In Malshej GhatSaam Tv

रोहिदास गाडगे, साम टीव्ही पुणे

माळशेज घाटामध्ये एक दुर्घटना घडली आहे. कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महामा्र्गावरून जात असताना रिक्षावर अचानक दरड कोसळली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहे. या दुर्घटनेमध्ये चुलता-पुतण्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

राहूल भालेराव,स्वयंम भालेराव अशी मृत चुलता पुतण्याची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असं की, भालेकर कुटूंबीय रिक्षाने कल्याण कडून नगरकडे जात (Landslide In Malshej Ghat) होते. तेव्हा टोकाडवडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षावरती दरड कोसळली अन् मोठा अपघात झाला. हे कुटुंब मुलूंड मुंबई येथून चंदनापुरी संगमनेर येथे आपल्या गावी जात असताना अपघात हा अपघात झाला (Malshej Ghat) आहे.

मलंगगडमधील दुर्घटना

राज्यभरात जोरदार पाऊस कोसळत (Landslide) आहे. या पावसामुळे मलंगगडाची दरड कोसळल्याची घटना घडली होती. ही दरड मलंगगडच्या पायथ्याशी राहणाऱ्या सय्यद यांच्या घरावर कोसळली होती. सोमवारी (१० जून) सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली होती. या दुर्देवी घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. संपूर्ण कुटुंब झोपेत असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

 माळशेज घाटामध्ये दरड कोसळली
Kedarnath Helicopter emergency landing : घिरट्या आणि हेलकावे घेत हेलिकॉप्टर खाली आलं; केदारनाथमधील इमर्जन्सी लँडिंगचा थरारक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, मलंगड डोंगराच्या मागच्या बाजूला जेएनपीटी-बडोदा महामार्गाच्या टनलचं काम सुरु होतं. त्यामुळे स्फोट करण्यात आले होते. या स्फोटांमुळे डोंगरामध्ये कंपन झालं होतं. त्यामुळे दरड कोसळल्याची माहिती मिळत (Pune News) आहे. या घटनेत गुलाम सय्यद नावाच्या व्यक्तीता मृत्यू झाला आहे. यामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तर दीड वर्षाच्या मुलाला वाचवाताना गुलाम सय्यद यांचा मृत्यू झाला आहे.

 माळशेज घाटामध्ये दरड कोसळली
Malanggad landslide : घरात गाढ झोपेत असताना मलंगगडाची दरड कोसळली, लेकाला वाचवताना वडिलांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com