Kedarnath Helicopter emergency landing : घिरट्या आणि हेलकावे घेत हेलिकॉप्टर खाली आलं; केदारनाथमधील इमर्जन्सी लँडिंगचा थरारक VIDEO

Kedarnath Helicopter Viral Video : रोटर खराब झाल्याचं समजताच पायलटने तातडीने हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. यंत्रणेला याबाबत माहिती मिळताच हेलिकॉप्टरच्या लँडिंगबाबत माहिती देण्यात आली.
Kedarnath Helicopter Viral Video
Kedarnath Helicopter emergency landing Saam TV
Published On

केदारनाथमध्ये एका हॅलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. यातून ६ व्यक्ती प्रवास करत होत्या. घिरट्या आणि हेलकावे घेत हेलिकॉप्टरचं उंचावरून इमर्जन्सी लँडिंग झालं आहे. या घटनेची दृश्य देखील समोर आलीत. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Kedarnath Helicopter Viral Video
Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

१० मेपासून केदारनाथ चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येथे जाण्यासाठी निघालेत. येथे पोहचण्यासाठी काही जण हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. त्यातच आता एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरचं रोटर खराब झाल्याने ही घटना घडली आहे. मोठी दुर्घटना घडण्याआधीच पायलटच्या ते लक्षात आले. रोटर खराब झाल्याचं समजताच पायलटने तातडीने हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. यंत्रणेला याबाबत माहिती मिळताच हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी व्यवस्था करण्यात आली होती.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पायलटने सावधानतेने हेलिकॉप्टर लँडिंग केलं नसतं तर आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हेलिकॉप्टर डोंगरापासून काही अंतरावर असतानाच घिरट्या आणि हेलकावे घेत आहे. लँडिंगच्या ठिकाणी अन्य काही व्यक्ती या हेलिकॉप्टरचा थरार पाहत आहेत. त्यात पायलटने या हेलिकॉप्टर सुखरूप लँडिंग केलं आहे.

Kedarnath Helicopter Viral Video
Rohit Sharma Helicopter Entry: रोहितचा स्वॅगच लय भारी! कार, बसने नाहीतर थेट खासगी हेलिकॉप्टरने धरमशालेत एन्ट्री -Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com