Lalbaugcha Raja 2024: अंबानी कुटुंबीयांकडून लालबागच्या राजाला १५ कोटींचं सोनं अर्पण, बाप्पाची पहिली झलक पाहिली का?

Ambani Family Offered 20 Kg Gold Crown To Lalbaugcha Raja: अंबानी कुटुंबीयांनी लालबागच्या राजाला तब्बल २० किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.
Lalbaugcha Raja 2024: अंबानी कुटुंबीयांकडून लालबागच्या राजाला १५ कोटींचं सोनं अर्पण, बाप्पाची पहिली झलक पाहिली का?
Ambani Family Offered 20 Kg Gold Crown To Lalbaugcha RajaSaam Tv
Published On

मुंबईमध्ये सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबईतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळख असलेल्या लालबागच्या राजाचे आगमन गुरूवारी झाले. राजाची पहिली झलक देखील भक्तांना पाहायला मिळाली. बाप्पाचे पहिले रुप पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. लालबागच्या राजाच्या आकर्षक मुकुटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. अंबानी कुटुंबीयांनी लालबागच्या राजाला तब्बल २० किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.

यंदाच्या लालबागच्या राजाचा मुकूट सोन्याचा असून अंबानी कुटुंबीयांनी यावर्षी हा मुकूट राजाला अर्पण केला आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्यामुळे गणेशभक्त असलेल्या अंबानी कुटुंबीयांनी राजाला १५ कोटी किंमतीचा २० किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण केला. सध्या राज्याच्या या मुकुटाची सगळीकडे चर्चा होत आहे. लालबागच्या राजाच्या पहिल्या रुपाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Lalbaugcha Raja 2024: अंबानी कुटुंबीयांकडून लालबागच्या राजाला १५ कोटींचं सोनं अर्पण, बाप्पाची पहिली झलक पाहिली का?
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार सुसाट, दोन नव्या मार्गिका तयार होणार; लोकलची संख्याही वाढणार!

मुंबईच्या लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन गुरूवारी झालं. लालबागच्या राजाची मनमोहक अशी १४ फुटांची बाप्पाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान झाली आहे. लालबागच्या राजा यंदा मयूर महलामध्ये विराजमान झाला आहे. लालबागच्या राजाचं हे ९१ वर्ष आहे. विशेष म्हणजे लालबागच्या राजावर यावर्षी २० किलो सोन्याचा मुकुट पाहायला मिळत आहे. या मुकुटाची किंमत तब्बल १५ कोटी रुपये आहे.

Lalbaugcha Raja 2024: अंबानी कुटुंबीयांकडून लालबागच्या राजाला १५ कोटींचं सोनं अर्पण, बाप्पाची पहिली झलक पाहिली का?
Pod Taxi in Mumbai: वांद्रे-कुर्ला धावणार पॉड टॅक्सी, ना गर्दीचं टेन्शन न् चालकाची कटकट, पण भाडे किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com