Nitin Desai Death: लालबागच्या राजाचा अपूर्ण राहिलेला मंडप कोण साकारणार? नितीन देसाईंनी काम तर सुरू केलं, पण त्या आधीच...

Lalbaugcha Raja Set 2023: चित्रपटाचा भव्य दिव्य सेट उभारणीसाठी नितीन देसाई यांची ओळख सर्वत्र होती, पण देसाई मुंबईमधील प्रसिद्ध लालबागच्या राजाचा सेट आणि मंडपही त्यांच्या नजरेतून साकारला जायचा.
Nitin Desai Designed Lalbaugcha Raja Set
Nitin Desai Designed Lalbaugcha Raja SetSaam Tv
Published On

Update on Nitin Desai Death:

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडीओमध्ये गळफास घेत जीवन संपवले. कला दिग्दर्शनाची दैवी देणगी लाभलेल्या नितीन देसाई यांच्या आत्महत्येने सिनेसृष्टीत खळबळ उडाली.

नितीन देसाईंच्या आत्महत्येने भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. नितीन देसाई हे गणरायाचे मोठे भक्त होते. नितीन देसाई यांची ओळख प्रामुख्याने चित्रपटाच्या सेट उभारण्यासाठी होती, पण देसाई मुंबईमधील प्रसिद्ध लालबागच्या राजाचा सेट आणि मंडपही त्यांच्या नजरेतून साकारला जायचा. नुकतेच त्यांनी सेट उभारणीच्या कामाला सुरूवात केली होती आणि त्यांचे ते काम कायमचच अपूर्ण राहिले आहे.

Nitin Desai Designed Lalbaugcha Raja Set
Pravin Tarade On Nitin Desai Death: 'ND असं करणं शक्यच नाही, भारतीय चित्रपटसृष्टीचा विश्वकर्मा हरपला', नितीन देसाईंच्या आठवणीत प्रवीण तरडे भावुक

गेल्या अनेक वर्षांपासून नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून लालबागच्या राजाच्या मंडपाची प्रतिकृती साकारली जायची. गेल्या काही दिवसांपूर्वी देसाई यांनी सोशल मीडियावर लालबागच्या राजाच्या सेटचे काम सुरू केल्याची माहिती दिली होती. नितीन देसाईंनी ४ जुलै २०२३ रोजी सोशल मीडियावर सेटचं काम सुरू केलं असल्याची माहिती दिली. फोटो शेअर करताना त्यांनी मंडपपूजन आणि डेकोरेशन करतानाचा काही फोटो शेअर केले होते.

नितीन देसाई यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, “लालबागच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो।। लालबागच्या राजाच्या ९० व्या वर्षीच्या मंडप पुजन आणि सजावटीचा श्री गणेशा आज संपन्न झाला. गणपती बाप्पा मोरया।।” अशा आशयाची कॅप्शन देत त्यांनी फोटो शेअर केले होते. २०२३ च्या ठरलेल्या थीमनुसार नितीन देसाई यांनी सेटचं डिझाइनही तयार केलं होतं.

Nitin Desai Designed Lalbaugcha Raja Set
Politicians on Nitin Desai: टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाईंचे वेगळे ऋणानुबंध; CM शिंदेंनी दिला आठवणींना उजाळा

पण, नितीन देसाई यांच्या अचानक एक्झिटने लालबागच्या राजाचे राहिलेले डेकोरेशनचं काम अपूरे राहिले. गणोशोत्सवाला अवघे ४५ दिवस शिल्लक आहेत. त्यांच्या जाण्याने सेटचे काम कोण? आणि कसं पूर्ण होणार? हा प्रश्न मंडळासमोर उभा राहिला आहे. नितीन देसाईंच्या अचानक एक्झिटने सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

Nitin Desai Designed Lalbaugcha Raja Set
Nitin Desai News: नितीने देसाईंची एक आठवण अशीही.... अवघ्या २० तासांच्या कष्टातून तो सोहळा अविस्मरणीय बनवला होता

गेल्या वर्षी लालबागच्या राजाच्या मंडपात राममंदिराचा देखावा साकरण्यात आला होता. तर लालबागच्या राजाच्या मंडपात यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा उभारण्याची योजना आखली होती. तो देखावा साकारण्यासाठी त्यांनी महिनाभरापासूनच कामाला सुरूवात केली होती. ३४९ वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता. तोच सोहळा नितीन देसाईंना राजाच्या भक्तांसमोर पुन्हा आणायचा होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com