Nitin Desai
Nitin DesaiInstagram

Nitin Desai News: नितीने देसाईंची एक आठवण अशीही.... अवघ्या २० तासांच्या कष्टातून तो सोहळा अविस्मरणीय बनवला होता

Nitin Desai News: २०१९ मध्ये झालेल्या ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्यामध्येही नितीन देसाई यांनी स्टेज उभारला होता.

Nitin Desai News: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या घटनेने हिंदीसह मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५८व्या वर्षी आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला. अनेक हिंदी चित्रपटांकरिता मोठ-मोठे सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आतापर्यंत अनेक टेलिव्हिजन शोसाठीही भव्य-दिव्य सेट उभारले होते. २०१९ मध्ये झालेल्या ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्यामध्येही नितीन देसाई यांनी स्टेज उभारला होता. अवघ्या २० तासांत हा सेट उभारल्याचे सांगितले जाते.

Nitin Desai
Nitin Desai Death Case: नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? स्थानिक आमदारांनी सांगितलं एक-दीड महिन्यापूर्वी झालं होतं बोलणं...

नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंनी शपथविधीसाठी भव्य-दिव्य स्टेज उभारला होता. १९९५ मध्ये शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारमध्ये शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी देखील शपथविधी सोहळ्याच्या स्टेजची उभारणी नितीन देसाई यांनीच केली होती. एवढेच नाही तर २०१४ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी देखील स्टेजची उभारणी नितीन देसाई यांनीच केली होती.

Nitin Desai
Nitin Desai Death Update: नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओवर होती जप्तीची टांगती तलवार, का ओढवली होती नामुष्की?

नितीन देसाई यांना १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '१९४२ अ लव्ह स्टोरी' चित्रपटातून खरी ओळख मिळाली होती. त्यांनी या चित्रपटासाठी भव्य-दिव्य सेट उभारला आहे. देसाई यांनी २०१० मध्ये 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या चित्रपटातील त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. सोबतच ट्रॅफिक सिग्नल, जोधा अकबर, लगान, मुन्नाभाई एमबीबीएस यासारख्या चित्रपटाच्या सेटची उभारणी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली होती. बॉलिवूडसह मराठी चित्रपटाकरिता देसाई यांनी आतापर्यंत १७८ हून अधिक सेटची निर्मिती केली आहे.

नितीन देसाई यांना हम दिल दे चुके सनम आणि लगान यांसारख्या चित्रपटांसाठी पुरस्कारही मिळाले आहेत. आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नितीन देसाईंना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे.

बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर २००५ मध्ये नितिन देसाईंनी कर्जतमध्ये एन.डी. स्टुडिओ सुरू केला. हा स्टुडिओ जवळपास ५२ एकराच्या परिसरात पसरलेला आहे. नितीन देसाईंनी याच स्टुडिओत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त कळताच बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com