सचिन कदम| रायगड, ता. ५ सप्टेंबर
Mumbai Goa Highway Bus Accident: गणपती उत्सवाला अवघे दोन दिवस राहिल्याने मुंबईतील चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी गडगड सुरु झाली आहे. आज सकाळपासून बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच मुंबई- गोवा महामार्गांवर चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात तिहेरी अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बोगद्यात मोठा अपघात झाला आहे. पोलादपूरजवळ कशेडी घाटात ही घटना घडली असून कोकणात जाणाऱ्या कंटेनरला मागून येणाऱ्या एस टी बसने धडक दिली, त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसने त्या बसला धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून अपघातानंतर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
दुसरा अपघात मुंबई गोवा महामार्गावरील सुळेळी खिंडीत घडला. सुळेळी खिंडीमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळित केली.
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करीत आहेत. रात्री मुंबईतून निघालेल्या चाकरमान्यांना ८ तास झाले तरी अर्धे अंतर देखील पार करता आले नाही. मागील २ तासांपासून हे चाकर मानी लोणेरे ते माणगाव दरम्यान अडकून पडले आहेत. तर कोलाड, नागोठणे, सुकेळी खिंड, इंदापूर, इथ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.