KDMC : केडीएमसीचा घोळ,156 अधिकृत होर्डिंगचे थकले 9 कोटी; ITRमधून माहिती उघड

KDMC Hoardings : मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माहितीचा अधिकारात केडीएमसीचा घोळ जगासमोर आणलाय. ITRमधून महापालिकेने होर्डिंगचे बीलच वसूल केले नसल्याचं समोर आले आहे.
KDMC : केडीएमसीचा घोळ, 156 अधिकृत होर्डिंगचे थकले 9 कोटी; ITRमधून माहिती उघड
KDMC Hoardings HT
Published On

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या अधिकृत 156 होर्डिंगचे शुल्क महापालिकेने वसूल केलेले नाही. या होर्डिंगच्या शुल्कापोटी 9 कोटीची थकबाकी असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात उघड केली आहे. एकीकडे ही थकबाकी वसूल केली जात नाही. होर्डिंग लावणारे ठेकेदार विविध जाहिरातदारांची जाहिरात फूकट करीत आहेत. तर दुसरीकडे सर्वसामान्य मालमत्ता कर थकबाकीदारांवर मात्र महापालिका कारवाई करत असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी कपिल पवार यांनी केला.

ही थकबाकी वसूल न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अधिकृत होर्डिंग किती व त्यांचे थकबाकी किती याची माहिती मनसेचे विभागाध्यक्ष कपिल पवार आणि गणेश लांडगे यांनी ही माहिती अधिकारात महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडे माहिती मागितली होती.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 156 अधिकृत होर्डिंगच्या शुल्कापोटी 9 कोटी रुपये वसूल झालेले नाहीत. जवळपास 10 होर्डिंग ठेकेदारांकडून 156 ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले होते. 2019 ते 2024 या कालावधीत या होर्डिंग ठेकेदारांनी कोटी रुपये महापालिकेस भरलेले नाहीत. एका ठेकेदाराला पाच वर्षाकरीता निविदा मंजूर केली जाते. त्याने ही निविदा दरवर्षी रिन्यूव्ह केली पाहिजे. अनेक कंत्राटदारांनी त्यांची मुदत संपली तरी त्यांची निविदा कालावधी रिन्यूव्ह केलेला नाही.

महापालिकेकडे होर्डिंगची पुरेशी माहिती देखील नाही. अनेकांची मुदत संपूष्टात येऊन देखील त्यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसून न करता त्यांच्या महापालिका मेहरबान का झाली आहे ? असा संतप्त सवाल मनसेचे पवार आणि लांडगे यांनी उपस्थित केला आहे. सामान्य व्यक्तीकडे कर थकला तर महापालिका मालमत्ता जप्तीची कारवाई करते. 9 कोटीची थकबाकी थकविणार्यांचा विरोधात वसूलीची कारवाई न करता महापालिकेने हात आखडता का घेतला आहे ? असा सवाल करत थकबाकी वसूल न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे

KDMC : केडीएमसीचा घोळ, 156 अधिकृत होर्डिंगचे थकले 9 कोटी; ITRमधून माहिती उघड
KDMC: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त ठेकेदार मस्त; प्रशासनाला कधी जाग येणार? शिवसेना माजी नगरसेवकाचा सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com