अभिजित देशमुख
कल्याण : भूखंडावरील जमीन मिळकतीचा कर वसूल करण्यासाठी कल्याण- डोंबिवली (Kalyan) महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने धडक कारवाई केली आहे. विकासकाच्या पाच सदनिकांना जप्तीची नोटीस बजावून त्यांना सील ठोकण्याची कारवाई केली आहे. (Tajya Batmya)
कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाअंतर्गत बारावे येथील मिळकतीवर महापालिकेस ४४ लाख १८ हजार २३२ रुपये कर येणे बाकी आहे. थकबाकी भरण्याबाबत केडीएमसीकडून वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या. तरी देखील थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. यामुळे महापालिकेने थकबाकीदारांवर धडक कारवाईचा बडगा उचलला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भूखंडावरील जमीन मिळकतीचा कर वसूल करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने धडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाअंतर्गत बारावे येथील मिळकतीवर महापालिकेस ४४ लाख १८ हजार २३२ रुपये कर येणे बाकी आहे. बारावे येथील शिवलीला इमारतीच्या इ विंग सोसायटीतील पाच सदनिकांना जप्तीची नोटीस बजावून सदनिकांना सील ठोकले आहे. या कारवाईनंतर पालिका प्रशासनाने त्यांचा मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.