जन्म दाखल्यात ‘V-W’ गोंधळ, पालकांचा 370 किमी प्रवास, एका शब्दासाठी 15 दिवसांची वाट पाहा, महापालिकेचा अजब कारभार

KDMC Birth Certificate Correction Delay In Kalyan: कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जन्म प्रमाणपत्रातील एका अक्षराच्या दुरुस्तीसाठी 15 दिवस लागणार असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
Parent visits KDMC office in Kalyan to correct a minor spelling error in birth certificate amid delay
Parent visits KDMC office in Kalyan to correct a minor spelling error in birth certificate amid delaySaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

जन्म प्रमाणपत्रातील केवळ एका शब्दाची दुरुस्ती करण्यासाठी पंधरा दिवस लागणार असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सांगितल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. सांगलीहून कल्याणमध्ये आलेल्या एका पालकाला हा अनुभव आल्याने त्यांच्या मुलाच्या कॉलेजमध्ये प्रवेशाबाबत चिंता निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केडीएमसी गटनेते उमेश बोरगावकर यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, केवळ एका शब्दाच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना एवढा कालावधी वाट पाहावी लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Parent visits KDMC office in Kalyan to correct a minor spelling error in birth certificate amid delay
Pune Crime: पुणे शहरात चाललंय काय? खंडणीसाठी अपहरण करत महिलांना ठेवले डांबून; चौघांना अटक

सोमवारीच अशा प्रकारच्या दुरुस्तीसाठी 15 ते 20 नागरिक त्यांच्या कार्यालयात आले होते. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्रे अवैधरित्या जारी झाल्याचा आरोप केला होता. सुमारे दोन हजार संशयित जन्म प्रमाणपत्रे आढळल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जन्म प्रमाणपत्रांबाबत अधिक सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असले तरी, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याची टीका होत आहे

Parent visits KDMC office in Kalyan to correct a minor spelling error in birth certificate amid delay
Bus Accident: कल्याण-नगर महामार्गावर विचित्र अपघात; एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारांचा गेला जीव, भयानक घटना

सांगलीचे रहिवासी प्रदीप वाणी यांच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये त्रुटी झाली होती. Wani ऐवजी vani हा शब्द वापरण्यात आल्याने दुरुस्तीसाठी ते कल्याणला आले होते. मात्र, संबंधित दुरुस्तीसाठी 15 दिवस लागतील, अशी माहिती त्यांना महापालिकेकडून देण्यात आली. याबाबत प्रतिक्रिया देताना उमेश बोरगावकर म्हणाले की, देशातील पहिली ई-गव्हर्नन्स महापालिका म्हणून ओळख असलेल्या केडीएमसीमध्ये जर एका शब्दाच्या दुरुस्तीसाठी 15 दिवस लागत असतील, तर महापालिकेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

Parent visits KDMC office in Kalyan to correct a minor spelling error in birth certificate amid delay
MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

बोरगावकर यांनी या विषयाची माहिती आयुक्तांना दिली असून नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com