Pune Crime: पुणे शहरात चाललंय काय? खंडणीसाठी अपहरण करत महिलांना ठेवले डांबून; चौघांना अटक

Pune Latest News: १७ लाख रुपयांच्या खंडणीसाठी २ महिलांचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरात समोर आला आहे.
Pune Latest News
Pune Latest NewsSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Crime News:

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. १७ लाख रुपयांच्या खंडणीसाठी २ महिलांचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरात समोर आला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांना अटक केली असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Pune Latest News
Beed Crime News: लग्नानंतरही बायको बॉयफ्रेंडशी फोनवर बोलायची; नवरा सांगून कंटाळला, शेवटी स्वतःलाच संपवलं

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांची आई मिनाक्षी पोखरे या जागृती सोशल फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था चालवतात. पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) स्टॉल मिळवून देते, असे सांगून त्यांनी आरोपींकडून १० लाख रुपये घेतले होते. या पैश्यांवरुन त्यांच्यात वाद सुरु झाला.

आरोपींनी एके दिवशी मिनाक्षी पोखरे व त्यांच्या सहकारी मनिषा पवार यांना उत्तमनगरमध्ये बोलवून त्यांना मारहाण करत त्यांचे अपहरण केले. त्यांना मोहोळ याच्या घरी नेऊन तेथे डांबून ठेवून मारहाण केली. त्या ठिकाणाहून फिर्यादी यांना फोन करुन १७ लाख रुपये आणून दे, नाही तर तुला व तुझ्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली.

फिर्यादीने याबाबत तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तपासाला सुरूवात केली. तपासावेळी पोलिसांना आरोपींनी महिलांना उत्तमनगर परिसरात डांबून ठेवल्याची माहिती मिळाली.

याच माहितेच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत महिलांची सुटका केली असून चौघांना अटक केली आहे. बाबुलाल मोहोळ, अमर मोहिते, प्रदिप नलवडे आणि अक्षय फड अशी अटक केलेल्यांची नावे असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Pune Latest News
Mumbai- Ahmedabad National Highway : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात, पती मृत्यूमुखी; पत्नीसह मुले सुखरुप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com