Beed Crime News: लग्नानंतरही बायको बॉयफ्रेंडशी फोनवर बोलायची; नवरा सांगून कंटाळला, शेवटी स्वतःलाच संपवलं

Beed Crime News: याप्रकरणी बीडच्या तलवाडा पोलिसात पत्नीसह तिच्या प्रियकराविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Georai Taluka Crime News
Beed Georai Taluka Crime NewsSaam TV

Beed Crime News: लग्नानंतरही विवाहितेने बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारणे सुरूच ठेवले. ही गोष्ट तिच्या पतीला कळाली, त्याने सामंजस्याची भूमिका घेत पत्नीला समजावून सांगितले. मात्र, तरीही पत्नीने बॉयफ्रेंडसोबत बोलणे तसेच त्याला भेटणे सुरूच ठेवल्याने कंटाळलेल्या पतीने उंदीर मारण्याचे विषप्राशन केले. (Latest Marathi News)

Beed Georai Taluka Crime News
Mumbai News: कौटुंबिक वाद विकोपाला, चुलत दीराचं वहिनीसोबत भयानक कृत्य; मुंबईतील धक्कादायक घटना

कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील (Beed News) गेवराई तालुक्यातील रूई येथे घडली. या प्रकरणी बीडच्या तलवाडा पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सलीम मेहमूद शेख (वय 22, रा. रुई, ता. गेवराई) असं मयत पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सलीम याचा विवाह 25 मे 2023 रोजी अर्धामसला येथील तरुणीसोबत झाला होता. लग्न झाल्यापासून सलीमची बायको बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलायची.

ही गोष्ट सलीमला कळाली, त्याने आपल्या बायकोला अनेकदा समज देखील दिली. मात्र तरी देखील तिने सलीमचं काहीही ऐकलं नाही. अखेर कंटाळून सलीमने राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. कुटुंबियांनी त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत सलीमचा भाऊ शाहरूख मेहमूद शेख याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) सलीमची पत्नी आयशा सलीम शेख, प्रियकर किरण पिंपळे यांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर किरण पिंपळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलीमची पत्नी आयशा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited by - Satish Daud

Beed Georai Taluka Crime News
Shocking News: सुखी संसाराचे स्वप्न, अहमदनगरमधून प्रेमीयुगुलाचे पलायन; कसारा येथे आढळले मृतदेह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com