
अभिजीत देशमुख, साम टीव्ही
Kalyan : कल्याण टिटवाळा जवळच्या खडवलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडून खडवली येथील पसायदान नावाच्या खासगी वसतिगृहात पाहणीदरम्यान दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचर करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तर शाळेतील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे.
या प्रकरणात कल्याण तालुका पोलिस ठाण्यात वसतिगृहाचे संचालक बबन शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, शाळेतील शिक्षिका दर्शना पंडीत आणि कामगार प्रकाश गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
प्रकाश गुप्ता हा मुलींवर लैगिंक अत्याचार करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे कल्याण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. निराधार मुलांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खडवलमधील पसायनदान या खासगी वसतिगृहात बेघर, निराधार आणि गोर-गरीब गरजू मुलांच्या राहण्याची तसेच जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या वसतिगृहात 12 ते 15 मुलं राहत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी पसायदान वसतिगृहात मुलांना बेदम मारहाण केली जात असल्याची तक्रार ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची गंभीर दखल समितीच्या अधिकाऱ्यांनी घेतली.
समितीच्या अधिकारी वर्गाने थेट पसायदान या खासगी वस्तीगृहाची पाहणी केली. पाहणीच्या दरम्यान शाळेतील मुलांना आणि मुलींना समितीच्या सदस्यांनी विचारपूस केली. तेव्हा मुलांना मारहाण केली जात होती. प्रकाश गुप्ता या कर्मचाऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी पसायदान या वसतिगृहाच्या संचालकांसह पाच जणांना अटक केली आहे.
ठाण्यात वसतिगृहाचे संचालक बबन शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, शाळेतील शिक्षिका दर्शना पंडीत आणि कामगार प्रकाश गुप्ता अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.