Kalyan Firing : कल्याणमध्ये गोळीबार; धक्कादायक कारण उघड, दोघांच्या मुसक्या आवळल्या

kalyan firing case linked to whatsapp status dispute : कल्याणमध्ये गोळीबाराची घटना घडली. व्हॉट्सअॅप स्टेटसवर फोटो ठेवल्याच्या रागातून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
तरुणांचा पाठलाग, नंतर गोळीबार; कल्याण हादरलं
कल्याणमध्ये गोळीबार, शहर हादरले - AI saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही | कल्याण

व्हॉट्सअ‍ॅप डीपी आणि स्टेटसवर फोटो ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून कल्याणमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुख्य आरोपीने स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची माहिती समजते. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

कल्याण पश्चिमेतील (Kalyan West) मोहने परिसरात राहणाऱ्या अभिषेक पवार उर्फ अभी आणि गौरव साळुंखे यांच्या गटामध्ये जुना वाद होता. २६ मे रोजी तरुणांच्या दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता अशी माहिती समोर आली आहे. पाटीलनगर परिसरात राहणाऱ्या मोनू फुलोरे या तरुणाने गौरव साळुंखेसोबतचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवला होता.

हा फोटो पाहून अभिषेक पवार प्रचंड चिडला. शुक्रवारी रात्री तो आपल्या दहा ते बारा साथीदारांसह मोनू फुलोरेचा शोध घेत पाटीलनगरमध्ये पोहोचला. अभिषेक आणि त्याच्या साथीदारांना पाहताच मोनू फुलोरे आणि त्याचा भाऊ तेथून पळून गेले. यावेळी अभिषेकने मोनूच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या गोळीबारातून मोनू फुलोरे बचावला. यानंतर अभिषेक पवार याने स्वतःच्या हातावर गोळी झाडून घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सुरुवातीला मोनू फुलोरेने गोळीबार (Firing case) केल्याची चर्चा होती. मात्र, खडकपाडा पोलिसांच्या (Khadakpada Police) तपासात संपूर्ण घटनाक्रम उघड झाला.

तरुणांचा पाठलाग, नंतर गोळीबार; कल्याण हादरलं
Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला

या प्रकरणी पोलिसांनी सोहेल तांबोळी आणि विजय भूतकर या दोघांना अटक केली आहे. जखमी अभिषेक पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग याबाबत खडकपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

तरुणांचा पाठलाग, नंतर गोळीबार; कल्याण हादरलं
Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com