KDMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी मिळणार २१,००० रुपये बोनस; कुणाच्या खात्यात किती येणार?

KDMC Diwali Bonus: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २१००० रुपये मिळणार आहेत.
KDMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी मिळणार २१,००० रुपये बोनस; कुणाच्या खात्यात किती येणार?
KDMC Diwali BonusSaam Tv
Published On: 
  • केडीएमसी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर

  • आशा सेविकांना केडीएमसीकडून ६००० रुपये बोनस मिळणारि

  • दिवाळीआधी केडीएमसी कर्मचाऱ्यांच्या खात्यात २१००० रुपये जमा होणार

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा दणक्यात होणार आहे. केडीएमसी कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपयांचा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. तर आशा सेविकांना ६००० रुपये बोनस स्वरूपात दिले जाणार आहेत.

केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिवाळीपूर्वी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. आयुक्तांच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

KDMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी मिळणार २१,००० रुपये बोनस; कुणाच्या खात्यात किती येणार?
Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे हे देखील बैठकीला उपस्थित होते. बासरे यांनी सांगितले की, बोनसचा लाभ ६००० कामगारांना होणार आहे. केडीएमसीमध्ये काम करणारे वर्ग १ आणि २ चे अधिकारी आणि सर्व श्रेणीतील कामगार, ठोक पगारी, वाहन चालक, केडीएमटीचे कामगार, महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, विविध आरोग्य योजनेसाठी काम करणारे कामगार या सर्वांना बोनस दिला जाणार आहे.

KDMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी मिळणार २१,००० रुपये बोनस; कुणाच्या खात्यात किती येणार?
India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

मागच्या वर्षी कामगारांना २० हजार रुपयांचा बोनस दिला गेला होता. याच रक्कमेवर आयुक्त ठाम होते. मात्र ही रक्कम कामगार सेनेला मान्य नसल्याने त्यात १ हजार रुपये वाढ करुन २१ हजार रुपये बोनस देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. गेल्या वर्षापासून आशा सेविकांना बोनस दिला जात आहे.

गेल्यावर्षी ५ हजार रुपये बोनस दिला गेला. यंदा त्यात १ हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आशा सेविकांना ६ हजार रुपये बोनस मिळणार आहे. येत्या आठवड्यात दिवाळी आहे. पगाराची तारीखही जवळ आली आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबरपर्यंत सगळ्यांना बोनसची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले.

KDMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी मिळणार २१,००० रुपये बोनस; कुणाच्या खात्यात किती येणार?
Post Office Bonus : पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या पगाराइतका बोनस; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com