Post Office Bonus : पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या पगाराइतका बोनस; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

India Post Bonus Explained: डाक कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने २०२५- २६ या आर्थिक वर्षाचा ६० दिवसांचा बोनस मंजूर केला आहे. पात्रता, बोनसची गणनाबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
Post Office Bonus
Post Office Bonussaam tv
Published On: 

केंद्र सरकारने पोस्ट विभागातल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या उत्पादकता आधारित बोनसला (PLB) मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या सॅलरीइतका बोनस मिळणार आहे. पण प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारी प्रत्यक्ष रक्कम त्याचे पात्र वेतन, सेवा कालावधी आणि लागू नियमांनुसार ठरणार आहे.

बोनसची रक्कम कशी ठरेल?

पोस्टाच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसचं गणित करण्यासाठी मासिक पात्र वेतनाची मर्यादा ७ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. बोनसचं गणित करताना पुढील सूत्र वापरले जाणार आहे.

बोनस = (सरासरी मासिक पात्र वेतन × ६०) ÷ ३०.४

या सूत्रानुसार, एखाद्या कर्मचाऱ्याचं सरासरी मासिक पात्र वेतन ७ हजार रुपये असल्यावर त्याला अंदाजे १३,८१६ रुपये बोनस मिळू शकतो. पण ही कमाल वेतन मर्यादेवर आधारित अंदाजित रक्कम आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एवढाच बोनस मिळेल, असं नाही.

Post Office Bonus
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! दिवाळीपूर्वी DA वाढणार? जुलैच्या महागाई भत्त्याबाबत मोठी अपडेट

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?

पोस्टाच्या या बोनस योजनेत मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), गट क आणि पात्र अराजपत्रित गट ब कर्मचारी यामध्ये येतात. तसेच नियमित ग्रामीण डाक सेवकांना (GDS) एक्स-ग्रेशिया बोनस, तर निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या कंत्राटी स्वरूपातील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना अॅड-हॉक बोनस मिळू शकतो.

तात्पुरत्या कर्मचाऱ्यांसाठी काय आहेत अटी?

पात्र कॅज्युअल कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत सलग किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, वर्षाला २४० दिवस काम केलेलं असावं. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा असलेल्या कार्यालयांसाठी ही मर्यादा २०६ दिवस आहे. या कर्मचाऱ्यांच्या गणनेसाठी १,२०० रुपयांची निर्धारित मासिक मजुरी विचारात घेतली जाईल.

Post Office Bonus
HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेट नसल्यास होणार दंडात्मक कारवाई; वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

बोनस कधी मिळणार?

डाक विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी बोनससंदर्भात आदेश जारी केला आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार पैसे जमा होण्याची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. ग्रामीण डाक सेवकांचा बोनस त्यांच्या टीआरसीए (TRCA) आणि संबंधित महागाई भत्त्याच्या आधारे ठरणार आहे. त्यामुळे अंतिम रक्कम आणि पैसे जमा होण्याच्या तारखेसाठी कर्मचाऱ्यांना विभागाच्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com