

दिवाळीच्या सणाआधी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) वाढीची उत्सुकता आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या संभाव्य वाढीची घोषणा सरकार दिवाळीआधी करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदा दिवाळी ८ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे सणाआधी सरकारकडून आनंदाची बातमी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. पण अजून वाढीच्या घोषणेची अधिकृत तारीख निश्चित झालेली नाही.
केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करतं. पहिली सुधारणा जानेवारीपासून, तर दुसरी जुलैपासून लागू केली जाते. महागाईचा वाढता परिणाम कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना DA आणि पेन्शनधारकांना DR दिला जातो. पण जुलै २०२६ च्या सुधारणेत किती टक्के वाढ होईल, याबद्दल अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
महागाई भत्त्यात वाढ झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात, तर पात्र पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते. वाढीचा प्रत्यक्ष लाभ संबंधित कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर आणि पेन्शनधारकाच्या लागू मूळ पेन्शनवर अवलंबून असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत शहरी महागाई दर ४.९ टक्के आणि ग्रामीण महागाई दर ६.१ टक्के असल्याचं नमूद करण्यात आलं. ऑगस्टमध्ये हे दर ४.३ टक्के आणि ५.२ टक्के होते. वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्चाचे गणित बिघडत असल्याने DA आणि DR वाढीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
जुलैपासून महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय उशिराने जाहीर झाला, तर सरकारी आदेशातल्या तरतुदींनुसार पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मागच्या कालावधीची थकबाकी म्हणजेच एरिअर्स मिळू शकतो. पण त्याची रक्कम वाढीची टक्केवारी, मूळ वेतन किंवा पेन्शन आणि थकबाकीच्या कालावधीवर अवलंबून असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.