Nashik News: नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी मिळणार बोनस; खात्यात किती रुपये जमा होणार?

Nashik Municipal Corporation: नाशिक महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कर्मचाऱ्यांना तब्बल ३१,५०० रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Nashik News: नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी मिळणार बोनस; खात्यात किती रुपये जमा होणार?
Nashik Municipal Corporation Saam Tv
Published On: 
  • नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

  • कर्मचाऱ्यांना ३१,५०० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार

  • नाशिकमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २१,५०० रुपये बोनस दिला जाणार

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीत मोठी भेट मिळणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना तब्बल ३१,५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस स्वरूपात मिळणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना सन २०२६, २०२७ आणि २०२८ या तीन वर्षांसाठीचा सानुग्रह अनुदान मंजूर झाला आहे. महापालिका आयुक्तांनी बोनसची घोषणा केली. आयुक्तांच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल S-१७ आणि त्यापेक्षा कमी वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांना ३१ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही २१ हजार ५०० रुपये बोनस स्वरूपात दिले जार आहेत. तर ६0 महिन्यांपेक्षा कमी कालावधीपासून कार्यरत असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना ५० टक्के बोनस दिला जाणार आहे.

Nashik News: नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी मिळणार बोनस; खात्यात किती रुपये जमा होणार?
India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीही सानुग्रह अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. आशा कर्मचारी, आरोग्यवर्धिनी, समग्र शिक्षा अभियानासह विविध योजनांतील कर्मचाऱ्यांना देखील बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता हे पैसे कधी खात्यात जमा होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत. आर्थिक परिस्थितीचा विचार करून नाशिक महानगर पालिकेने हा निर्णय घेतला. दिवाळी सण आनंदात साजरा करण्यासाठी बोनस मिळणार असल्याचे मनपा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.

Nashik News: नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी मिळणार बोनस; खात्यात किती रुपये जमा होणार?
Post Office Bonus : पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या पगाराइतका बोनस; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com