Jalna : गोदावरी नदीत शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन; पिकविमा आणि अनुदानाची रक्कम थकलेलीच

Jalna News : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन पिकांना सुरक्षित कवच दिले होते. मात्र नुकसान होऊन देखील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकत नाही
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकविम्याची रक्कम तसेच शासनाने जाहीर केलेल्या मदत निधीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जालन्यातील गोंदी येथील गोदावरी नदीपात्रामध्ये विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन सुरू केल आहे. यावेळी प्रामुख्याने पीकविमा आणि अनुदानाची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन पिकांना सुरक्षित कवच दिले होते. मात्र नुकसान होऊन देखील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. शिवाय अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु या अनुदानाची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. 

Jalna News
Navapur : वन मंत्राच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मान; ४० दिवसांनी वनक्षेत्रपालाचे निलंबन, १ कोटी १३ लाख रुपयांची अनियमितता

अशा आहेत मागण्या 

शेतकऱ्यांना VK नंबर त्वरित उपलब्ध करूण द्यावे. अनुदान रक्कम जमा करणे, केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान देणे, पिक विमा सन २०२४ वाटप करणे, ज्या शेतकऱ्यांनी सोलरसाठी ऑनलाईन पेमेंट करून रिजेक्ट केले, त्यांचे पैसे परत करणे. तसेच जुने मागील सोलर दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करून देणे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कार्यालयी नियमित हजर राहणे. पिकाच्या निकषाप्रमाणे पीक कर्ज वाटप करणे, थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांना येणारी विविध योजनेची रक्कम अकाउंट होल्ड काढून देणे,शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारी डीपी, पोल, तारा किंवा अन्य उपकरणाची तात्काळ दुरुस्ती करणे; या मागण्या आहेत. 

Jalna News
Cyber Crime : परदेशातून गिफ्ट पाठवण्याचे आमिष पडले महागात; नवी मुंबईतील महिलेची ५० लाखांत फसवणूक

तोपर्यंत बाहेर येणार नाही
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जालन्यातील गोंदी येथील नदीपात्रामध्ये शेतकऱ्याने सामूहिक जलसमाधी आंदोलन सुरू केला आहे. जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही; तोपर्यंत नदीपात्राच्या बाहेर येणार नाही असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com