Cyber Crime : परदेशातून गिफ्ट पाठवण्याचे आमिष पडले महागात; नवी मुंबईतील महिलेची ५० लाखांत फसवणूक

navi Mumbai news : सोशल मीडियावर एका परदेशी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. स्वत:ला युकेमध्ये राहणारा व्यावसायिक असल्याचे सांगत महिलेशी चांगली मैत्री केली तिच्यासाठी महागडे गिफ्ट्स पाठवत असल्याचे सांगितले
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

विकास मिरगणे 

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून सायबर ठगांनी तब्बल ४९ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत करण्यात आली असून,याप्रकरणी महिलेने रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया वापरल्या जात असतात. त्यानुसार गिफ्ट पाठविण्याच्या नावाने फसवणूक करण्यात आली आहे. यात तक्रारदार महिलेला सोशल मीडियावर एका परदेशी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्या व्यक्तीने स्वत:ला युकेमध्ये राहणारा व्यावसायिक असल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर त्याने महिलेशी चांगली मैत्री केली आणि तिच्यावर विश्वास बसल्यावर तिच्यासाठी महागडे गिफ्ट्स (सोने, आयफोन, परदेशी चलन) पाठवत असल्याचे सांगितले. 

Cyber Crime
Mumbai Local Accident : दोन फास्ट लोकलचा अपघात, रेल्वे रूळावर मृत्यूतांडव, ६ जणांचा मृत्यू

पार्सलवर कर, दंडाची भरायला लावली रक्कम 

दरम्यान काही दिवसांनी महिलेला एका कथित कस्टम अधिकारीचा फोन आला. त्यानुसार त्याने परदेशातून आलेल्या गिफ्टमध्ये जास्त किंमतीच्या वस्तू आणि विदेशी चलन असल्यामुळे त्या पार्सलवर भरपूर कर आणि दंड भरावा लागेल. त्यासाठी महिलेला टप्प्याटप्प्याने ४९ लाख ५९ हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन ट्रान्सफर करायला लावण्यात आले. यावेळी महिलेला सांगण्यात आले की हे पैसे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत दिले जातील. मात्र, पुढे त्या परदेशी व्यक्तीने आणि कथित कस्टम अधिकाऱ्याने संपर्क तोडला.

Cyber Crime
Navapur : वन मंत्राच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मान; ४० दिवसांनी वनक्षेत्रपालाचे निलंबन, १ कोटी १३ लाख रुपयांची अनियमितता

अखेर गुन्हा दाखल 

बऱ्याच दिवसांचा कालावधी झाल्यानंतर संशय आल्यावर पीडित महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. तर पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, ही फसवणूक एखाद्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीने केली आहे. आरोपींनी बनावट कस्टम अधिकारी बनून महिलेला सातत्याने फोन करून विश्वास संपादन केला आणि पैसे उकळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com