Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?

Diwali Bonus For Central Government Employee: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यांना दिवाळीपूर्वीच बोनस दिला जाणार आहे.
Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?
Diwali BonusSaam Tv
Published On: 
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळणार

  • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ३० दिवसांचा बोनस मिळणार आहे

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना ६,९०८ रुपये बोनस मिळणार

  • २०२५-२६ या आर्थिक वर्षातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या बोनसचे नियम जारी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. सरकार दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना एक मोठं गिफ्ट देणार आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३० दिवसांचा नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देण्यास मंजुरी दिली आहे. या कर्मचाऱ्यांना साधारण १ महिन्याचा पगार बोनस स्वरूपात मिळेल.

अर्थ मंत्रालयाने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार, पात्र कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळेल. या बोनसची गणना करण्यासाठी कमाल मासिक पगाराची मर्यादा ७,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांचे सरासरी मासिक वेतन या मर्यादेइतके किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांनाच ३० दिवसांसाठी कमाल ६,९०८ रुपये बोनस मिळेल. ज्या कर्मचाऱ्यांचे सरासरी मासिक वेतन या मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांना कमी बोनस रक्कम मिळेल.

Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?
Diwali bonus issue : बोनस दिला नाही, कर्मचारी संतापले, असं काही केलं की मालकाला बसला शॉक | VIDEO

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या खर्च विभागाने सांगितले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या या बोनससाठी राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा गट क आणि गट ब मधील अशा अराजपत्रित कर्मचाऱ्यांना होणार आहे जे कोणत्याही उत्पादकता-आधारित बोनस योजनेअंतर्गत समाविष्ट नाहीत.

Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?
Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

शासनाने दिलेल्या आदेशानुसार, केंद्र सरकारचे गट 'क' कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ होणार आहे. गट ब मधील अराजपत्रित कर्मचारी जे इतर कोणत्याही उत्पादकता संलग्न बोनस योजनेअंतर्गत समाविष्ट नाहीत त्यांना देखील याचा लाभ मिळेल. पात्र केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि सशस्त्र दलांमधील कर्मचारी यांना देखील बोनस मिळेल. केंद्र सरकारप्रमाणेच वेतन प्रणाली लागू असलेल्या केंद्रशासित प्रदेशांमधील असे पात्र कर्मचारी जे इतर कोणत्याही बोनस किंवा सानुग्रह योजनेअंतर्गत समाविष्ट नाहीत त्यांना हो बोनस दिला जाणार आहे.

Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?
SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

या बोनसचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी किमान सहा महिन्यांची सेवा केली आहे. यासाठीकर्मचारी ३१ मार्च २०२६ रोजी सेवेत असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात किमान सहा महिन्यांची सलग सेवा पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. सहा महिने ते एक वर्ष या कालावधीतील पात्र सेवेच्या आधारावर बोनस प्रमाणानुसार त्यांना दिवाळीमध्ये बोनस दिला जाणार आहे

Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?
Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com