कल्याण- डोंबिवलीत पाणीकपात, २ दिवस पाणी पुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Kalyan Dombivli 24 Hour Water Cut May 11 Details: कल्याण-डोंबिवलीत पावसाळा उशिरा सुरू होण्याच्या शक्यतेमुळे केडीएमसीकडून २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Residents in Kalyan-Dombivli prepare for water storage as KDMC announces a 24-hour water supply shutdown amid monsoon delay concerns.
Residents in Kalyan-Dombivli prepare for water storage as KDMC announces a 24-hour water supply shutdown amid monsoon delay concerns.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

भारतीय हवामान खात्याने यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त केल्याने कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने जलसंपदा विभागासोबत महत्त्वाची बैठक घेऊन पाणीपुरवठा कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कल्याण-डोंबिवली शहरात सोमवार, ११ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवार, १२ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सलग २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Residents in Kalyan-Dombivli prepare for water storage as KDMC announces a 24-hour water supply shutdown amid monsoon delay concerns.
राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ही कपात आवश्यक असल्याचे केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Residents in Kalyan-Dombivli prepare for water storage as KDMC announces a 24-hour water supply shutdown amid monsoon delay concerns.
Special Report : Pune Murder News | वाढदिवसाला गिफ्ट दिलं नाही म्हणून केली पतीची हत्या

नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे, तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे. या कपातीमुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होणार असली तरी दीर्घकालीन पाणी व्यवस्थापनासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे केडीएमसी प्रशासना कडून स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com