Jay Pawar statement on VSR company owner
Jay Pawar statement on VSR company owner

VSR विमान कंपनीच्या मालकाला अटक करा, जय पवारांची मागणी, थेट तो व्हिडिओ केला पोस्ट

VSR company controvers : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या अहवालानंतर जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अटक करण्याची मागणी केली आहे. व्हायरल व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी डीजीसीएकडे कठोर कारवाई आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Published on

Jay Pawar statement on VSR company owner : अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अटक करण्याची मागणी केली आहे. जय पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या अहवालावर नाराजीही व्यक्त केली आहे. जय पवार यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा एक व्हिडिओ पोस्ट करत अटक करण्याची मागणी केली आहे.

जय पवार यांनी कोणता व्हिडिओ केला पोस्ट -

जय पवार यांनी केली VSR कंपनीचे मालक यांना अटक करण्याची मागणी केली. VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. एका विमानात पायलटच्या खुर्चीवर VSR कंपनीचे मालक रोहित सिंह चक्क झोपले असल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे.

Jay Pawar statement on VSR company owner
मॅच विनिंग ९७ धावा करताच संजूनं घेतलं विराट-रोहितचं नाव, शेवटच्या क्षणापर्यंत डोक्यात काय चाललं होतं?

तोपर्यंत सर्व विमाने रद्द करा -

या सर्व घटनेची संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ रद्द करावीत, अशी मागणी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांना गमावल्याचे दुखही व्यक्त केले आहे. दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या अहवालावर जय पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अहवाल सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत असं जय पवारांनी म्हटलंय...त्यांनी पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत जय पवार यांनी भावना  व्यक्त केल्या.

Jay Pawar statement on VSR company owner
Dubai attack : महायुद्ध भडकलं! दुबईतल्या हल्ल्यात भारतीय नागरिक जखमी | VIDEO

काय आहे जय पवार यांची पोस्ट आणि व्हिडीओ

माझ्या वडिलांना आपण गमावले... ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो - या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी. अशी पोस्ट जय पवार यांनी केली आहे.

Jay Pawar statement on VSR company owner
मुंबईत मिळणार फायनलचे तिकिट; उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत? वाचा संपूर्ण वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com