संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, बायकोला क्रूरपणे संपवलं; नवऱ्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

kalyan crime news : कल्याणमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची घटना घडली. या महिलेच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.
Kalyan latest news
kalyan newsSaam tv
Published On

मी माझ्या बायकोची हत्या करून आलो आहे, हे ऐकताच पोलिस चक्रावले

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या

पती पोलिसांच्या ताब्यात

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने क्रूरपणे बायकोची हत्या केली. बायकोची हत्या करून नवरा कल्याणमधून नाशिकमध्ये भावाकडे पोहाचला. त्यानंतर भावाने आरोपी भावाला नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर केलं. आरोपीने पोलीस ठाण्यात बायकोची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर सरकारवाडा पोलिसांनी कल्याण पोलिसांना फोन करून खात्री केली. त्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे.

कल्याणमधील व्यक्तीने सांगितले की, मी बायकोची हत्या करुन आलो आहे. हे ऐकून पोलिसही चकीत झाले. नाशिक पोलिसांनी जेव्हा खडकपाडा पोलिसांना याची माहिती दिली. खडकपाडा पोलिसांनी घरी जाऊन खात्री केली. त्यानंतर महिला घरात मृत अवस्थेत होती.पोलिस पथक आरोपीला अटक करण्यासाठी नाशिकला रवाना झाले आहेत. चारित्र्याच्या संशयावरुन विशाल भुतकर नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी अर्चना हिची हत्या केली आहे.

Kalyan latest news
महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

नेमकं काय घडलं?

नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एक व्यक्ती आपल्या भावाला घेऊन आला. त्या व्यक्तीने सांगितले की, माझा भाऊ काय बोलतो हे ऐका. पोलिसांनी विशाल भुतकर नावाच्या या व्यक्तीची विचारपूस केली. विशालने सांगितले की, माझा माझ्या पत्नीसोबत वाद होता. यावरुन मी कल्याणला गेलो. उंबर्डे परिसरात माझी पत्नी राहत होती. तिथे तिच्या घरी जाऊन तिची गळा आवळून तिची हत्या केली आहे. हे ऐकून पोलिस देखील हैराण झाले.

Kalyan latest news
प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

विशाल खरे बोलतो आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी नाशिक पोलिसांनी खडकपाडा पोलिसांना फोन केला. ही माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांचे पथक विशालने सांगितलेल्या पत्त्यावर पोहचले. त्याठिकाणी एक महिला मृतावस्थेत पडलेली होती. विशालने जी माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार विशाल आणि अर्चना यांच्यात अनेक महिन्यापासून वाद होता. दोघांना दोन मुले आहे. एक मुल विशालकडे तर एक मुल अर्चनाच्या आईकडे आहे. अर्चनाच्या चारित्र्यावर विशाल संशय घेत होता. चारित्र्याच्या संशयावरुन विशालने अर्चनाची गळा आवळून हत्या केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com