Pune Rainfall: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदीचे स्वरूप, घरांमध्ये शिरलं पाणी; शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

Pune Flood: पुण्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. या पावसाचा पुण्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले तर अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले.
Pune Rainfall: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदीचे स्वरूप, घरांमध्ये शिरलं पाणी; शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
Pune Rainfall Saam Tv
Published On
  • पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे

  • या पावसामुळे पुण्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे

  • रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून पाणी घरात शिरले

  • इंद्रायणी नदीच्या पुराचा फटका

सागर आव्हाड, पुणे

पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. तर इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट...

वाघोली आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर ओढ्यासारखे पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाघोली बसस्टॉपच्या मागील रस्त्यावर अशाच एका मोठ्या खड्ड्यात टेम्पो अडकल्याने तो पलटी झाला. या अपघातात एका महिलेला किरकोळ दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन टेम्पो सरळ करत मदतकार्य केले.

Pune Rainfall: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदीचे स्वरूप, घरांमध्ये शिरलं पाणी; शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
Maharashtra Rainfall : मान्सूनचा राज्यातून निरोप, पण वादळी पावसाचा इशारा; पुढचे ४ दिवस धो-धो कोसळणार

दरम्यान, इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने भावडी येथील कदमवस्ती परिसरातील चार ते पाच घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या घरांतील तब्बल २७ नागरिकांना ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी हलवून मोठी मदत केली. एकूणच संततधार पावसामुळे वाघोलीतील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना आणि नियोजन करण्यात महापालिका अपयशी ठरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Pune Rainfall: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदीचे स्वरूप, घरांमध्ये शिरलं पाणी; शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू

दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने वाघोलीतील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. जलमय रस्ते, वाढलेले खड्डे, पुरामुळे बाधित घरे आणि वाहतुकीची मोठी समस्या यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन आता तातडीने उपाययोजना करते का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झाला आहे. या पावसामुळे मिसिंग लिंकजवळ दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Pune Rainfall: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदीचे स्वरूप, घरांमध्ये शिरलं पाणी; शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com