Indrayani : 'इंद्रायणी'च्या आयुष्यात नवं वादळ; कसा उधळणार श्रीकलाचे कपटी डाव? पाहा VIDEO

Indrayani Update : 'इंद्रायणी' मालिका आता रंजक वळणावर आली आहे. श्रीकला 'इंद्रायणी'च्या आयुष्यात नवं वादळ बनून आली आहे. 'इंद्रायणी' श्रीकलाला कसा धडा शिकवणार, जाणून घेऊयात.
Indrayani Update
Indrayanisaam tv
Published On
Summary

'इंद्रायणी' मालिकेत श्रीकला नावाचे वादळ आले आहे.

श्रीकला रोज नवीन कटकारस्थान करताना दिसत आहे.

'इंद्रायणी' श्रीकलाला चांगला धडा शिकवणार आहे.

'इंद्रायणी' मालिकेत सध्या श्रीकला नावाचे वादळ आले आहे. 'इंद्रायणी' मालिकेत सध्या श्रीकला आणि इंद्रायणी यांच्यात संघर्ष रंगला आहे. जो प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. महाएपिसोड पासून सुरू झालेल्या या ड्रामात श्रीकला इंद्रायणीला त्रास देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र, इंद्रायणी तिच्या प्रत्येक डावाला हुशारीने हाणून पाडते. तिची कट कारस्थान फोल ठरवते. श्रीकला आता दिग्रसकरांच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी वेगळाच गेम खेळते.

व्यंकू महाराज, गोपाळ, घरातील संपत्ती, दागिने या सर्वांवर श्रीकलाची नजर आहे. श्रीकलाचे कपटी डाव इंद्रायणी उधळवून लावणार आहे. श्रीकलाच्या प्रत्येक कारस्थानवर इंद्रायणी घराची राखणदार म्हणून तिला पुरून उरणार आहे. श्रीकला हीच दिग्रसकर घराण्यावरचे संकट आहे. श्रीकला प्रत्येक वळणावर 'इंद्रायणी' आणि तिच्या कुटुंबाला त्रास देताना दिसत आहे. त्यामुळे आता मालिकेत 'इंद्रायणी' आणि श्रीकला एकमेकांच्या विरोध पाहायला मिळत आहेत. 'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळते.

मालिकेत श्रीकला आणि 'इंद्रायणी' यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र ऑफ स्क्रीन कलाकारांची धमाल मस्ती सुरू असते. हिवाळा सुरू झाला आहे. अशात 'इंद्रायणी मालिकेचे शूट outdoor देखील सुरू असते. तेथे कलाकार खूप मजा मस्ती करतात. तसेच स्वतःची काळजी देखील घेतात. सध्या 'इंद्रायणी' चे शूट नाशिकला सुरू आहे.

'इंद्रायणी' मालिकेत श्रीकला गोपाळसोबत लग्न करून आल्यापासून 'इंद्रायणी'च्या आयुष्यात एकावर एक संकट येत आहे. तर दुसरी कडे शाळा बांधण्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. शाळेच्या जमिनीवरील अतिक्रमणाचं खापर मोहितराव बोडकेने दिग्रसकरांवर फोडलं. तर आनंदीबाईंच्या प्रश्नाने श्रीकला गोंधळताना येणाऱ्या भागांमध्ये दिसणार आहे.

Indrayani Update
Naagin 7 Video : शत्रूंचा नाश करायला येतेय 'नागिन'; बिग बॉसमधील २ स्पर्धकांची वर्णी, वेळ अन् तारीख काय?

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com