Indrayani : अंधश्रद्धेला झुगारून 'इंद्रायणी' गावात कशी सुरू करणार शाळा? पाहा VIDEO

Indrayani Marathi Serial Update :'इंद्रायणी' मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शाळा सुरू करताना अंधश्रद्धेचा मोठा अडथळा इंदू समोर आला आहे.
Indrayani Marathi Serial Update
IndrayaniSAAM TV
Published On
Summary

'इंद्रायणी' मालिकेत आता नवीन वळण पाहायला मिळत आहे.

इंदू समोर शाळा सुरू करताना अंधश्रद्धेचा मोठा अडथळा आला आहे.

इंदूला अधू, व्यंकू महाराजांची साथ लाभली आहे.

'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेत रोज नवीन वळण पाहायला मिळत आहे. 'इंद्रायणी' मालिकेत विठूच्या वाडीत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा रंगात आला असताना वातावरणात अचानक एक नवा उत्साह येतो. गावाच्या शाळेबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून काही जणांच्या चेहर्‍यावर आशा, तर काहींच्या चेहर्‍यावर संभ्रम स्पष्ट दिसत आहे. एका बाजूला शिक्षणासाठीचा निर्धार तर दुसरीकडे जुन्या समजुतींचा पगडा यामध्ये संपूर्ण गावच अडकलेले दिसत होते.

मालिकेत इंदूचे गावात शाळा सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून त्यात मोहीतराव मिठाचा खडा टाकताना दिसणार आहे. ज्या जमिनीवर शाळा सुरू करण्यासाठी इंदू भूमी पूजन करणायचा निर्धार करते त्याला गावातील काही लोक विरोध करताना दिसणार आहेत. "भुताच्या मळावर शाळा सुरू करू देणार नाही" असे म्हणत इंदूला थांबवताना दिसणार आहेत. त्यावर त्यांना इंदू ठणकावून सांगते की, शिक्षणाचे मंदिर तर इथेच उभे राहणार.

स्वातंत्र्य दिनाचा सोहळ्या दरम्यान अनपेक्षित घोषणा झाल्याने गावकर्‍यांमध्ये खळबळजनक वातावरण निर्माण होणार आहे. ज्या जमिनीवर शाळा बांधली जाणार आहे, तिच्या संदर्भात गावात आधीपासून अनेक कथा आणि समजुती आहेत. काही लोक त्याकडे प्रगतीच्या संधी म्हणून पाहत आहे तर काही या निर्णयावर उघडपणे विरोध व्यक्त करताना दिसणार आहेत.

'इंद्रायणी' मालिकेत गावातील दोन भिन्न विचारसरणी ठळकपणे समोर आल्या आहेत. एक गट इंद्रायणीच्या बाजूने शिक्षणाच्या तयारीत आहे. तर दुसरा गट मोहितराव सोबत जुन्या अंधश्रद्धांना धरून भूमिका मांडत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञानाचा अंधार दूर करण्याच्या संकल्पाने प्रेरित झालेली इंद्रायणीचे पुढचे पाऊल काय असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

अंधश्रद्धेला झुगारून इंद्रायणी घडवणार शिक्षण क्रांती. अधूची साथ, व्यंकू महाराजांचा आशीर्वाद यांचे पाठबळ इंदू जवळ आहे. पण या सगळ्यात गावकऱ्यांना इंदू कशी समजावणार? हे मालिकेत पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळते.

Indrayani Marathi Serial Update
Mrunal Thakur : "धनुष हा माझा..."; मृणाल ठाकूरने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com