लाकडी पट्ट्याने डोक्यात वार, ३० वर्षीय तरुणाची हत्या; २४ तासांत आरोपी गजाआड

Goregaon Killed Case Solved Within 24 Hours By Mumbai Police: गोरेगाव पश्चिमेतील प्रेमनगर परिसरात किरकोळ वादातून ३० वर्षीय अजीज खान यांची हत्या करण्यात आली. गोरेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास करत दोन आरोपींना अटक केली.
30-year-old man killed outside Salman Hotel in Goregaon West
30-year-old man killed outside Salman Hotel in Goregaon Westsaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: गोरेगाव पश्चिमेतील प्रेमनगर परिसरात सलमान हॉटेलसमोर झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा गोरेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. अजीज मोहम्मद अतिक खान (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी अजय मुन्नी उपाध्याय (वय ३९) आणि विकास देवराज पासवान (वय २३) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पश्चिमेतील प्रेमनगर परिसरातील सलमान हॉटेलसमोर एका इसमाला मारहाण करण्यात आली. मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उमरे, रात्रपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक पेचे, बीट अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड तसेच पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

30-year-old man killed outside Salman Hotel in Goregaon West
CIDCO Lottery: नवी मुंबईत घ्या फक्त २५ लाखांत घर, सिडकोची प्राईम लोकेशनवर ४७७९ घरांसाठी लॉटरी; कुठे किती घरं?

मृताचा भाऊ हबीब मोहम्मद अतिक खान याने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपासाला वेग आला. तक्रारीनुसार, अजीज खान हा सलमान हॉटेलचा मालक दानिश खान याला जेवणाचे पूर्ण बिल देण्यास सांगत होता. याच कारणावरून दोन अनोळखी व्यक्तींनी अजीज खान याच्याशी वाद घातला. “तेरा क्या संबंध है, तू हमको जानता नहीं है, तेरेको देख लेंगे,” असे म्हणत आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी हाताने तसेच फळे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी बॉक्सच्या पट्ट्याने अजीज खान याच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

30-year-old man killed outside Salman Hotel in Goregaon West
धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

सुरुवातीला घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींना आरोपींची ओळख पटत नव्हती. तसेच आरोपींबाबत पोलिसांकडे कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे आरोपींची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. गोरेगाव पोलिसांनी या आव्हानाचा स्वीकार करत पोलीस उपआयुक्त, उत्तर परिमंडळ-१ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदारांची सहा तपास पथके तयार केली. या पथकांनी गोरेगाव परिसरात सातत्याने शोधमोहीम राबवून गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.

30-year-old man killed outside Salman Hotel in Goregaon West
Shocking : मुंबई हादरली! प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; बिझनेसमनला बेड्या

तपासादरम्यान आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर १३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे २.४३ वाजता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. अटक आरोपींमध्ये १) अजय मुन्नी उपाध्याय, वय ३९ वर्षे, व्यवसाय- काही नाही, रा. हनुमाननगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई आणि २) विकास देवराज पासवान, वय २३ वर्षे, व्यवसाय- ऑफिस बॉय, रा. प्रेमनगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई यांचा समावेश आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

तपास पथकाचे उल्लेखनीय योगदान

ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का. व सु.) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त उत्तर परिमंडळ-१ पुरुषोत्तम कराड आणि सहायक पोलीस आयुक्त गोरेगाव विभाग सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उमरे, पोलीस निरीक्षक उमेश दांडेले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) साई पेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश चौगुले, राठोड, दीपक खारडे, योगेश रांधे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कांबळे, आकाश काळे, सत्यपाल बोधे, विशाल दौंडकर, अक्षय मांडळे, रोहन कोलारे, सूर्यभान घोळप, गजानन हरबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार प्रदीप कुलट, विनोद चव्हाण, दिनकर तावडे, दत्तात्रय बागुल, सचिन दळवी, कल्पेश नेहरे, भरत कदम, पोलीस शिपाई सौरभ चव्हाण, प्रज्वल मोहिते, भूपेंद्र सालकर, विशाल दानी, सतीश पाटील, सचिन मेश्राज आणि सुहास शिंदे यांनी तपासात उल्लेखनीय कामगिरी केली. घटना घडल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केल्याने गोरेगाव पोलिसांच्या तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com