Shocking : मुंबई हादरली! प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; बिझनेसमनला बेड्या

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
MUMBAI AIRPORT HOTEL ALLEGED SEXUAL ASSAULT CASE: AHMEDABAD BUSINESSMAN ARRESTED, POLICE INVESTIGATION UNDERWAY
MUMBAI AIRPORT HOTEL ALLEGED SEXUAL ASSAULT CASE: AHMEDABAD BUSINESSMAN ARRESTED, POLICE INVESTIGATION UNDERWAYSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई विमानतळ परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

  • पीडित महिलेच्या तक्रारीनंतर अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

  • आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विमानतळ परिसरातील एका नामंकित हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी अहमदाबाद येथील एका व्यावसायिकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेने २३ जुलै रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांची पूर्वीपासून ओळख होती. २० जुलै रोजी दोघेही मुंबई विमानतळाजवळील एका नामंकित हॉटेलमध्ये गेले होते. तिथे दोघेही राहिले होते. त्यानंतर २२ जुलै रोजी आरोपीने महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेने २३ जुलै रोजी विमानतळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

MUMBAI AIRPORT HOTEL ALLEGED SEXUAL ASSAULT CASE: AHMEDABAD BUSINESSMAN ARRESTED, POLICE INVESTIGATION UNDERWAY
Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला. त्यानंतर २४ जुलै रोजी आरोपीला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात पोलिसांकडून हॉटेलमधील पुराव्यांची तपासणी केली जात आहे. तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MUMBAI AIRPORT HOTEL ALLEGED SEXUAL ASSAULT CASE: AHMEDABAD BUSINESSMAN ARRESTED, POLICE INVESTIGATION UNDERWAY
Mumbai : मुंबईतील रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची जोरदार चर्चा; भाजपला डिवचलं

या संदर्भात मुंबई पोलिसांचे उपायुक्त (डीसीपी) निमित गोयल यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ६४, ७४, ७५(२), ७६ आणि ३३३ अन्वये विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com