CIDCO Lottery: नवी मुंबईत घ्या फक्त २५ लाखांत घर, सिडकोची प्राईम लोकेशनवर ४७७९ घरांसाठी लॉटरी; कुठे किती घरं?

Navi Mumbai CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत सिडकोच्या ४७७९ घरांसाठी लॉटरी लॉटरी निघाली आहे. उद्यापासून म्हणजे १५ ऑगस्टपासून नोंदणी करण्यास सुरूवात होणार आहे.
CIDCO Lottery 2026
CIDCO Lottery 2026Saam Tv
Published On
  • सिडकोच्या ४७७९ घरांची लॉटरी

  • सिडको लॉटरीमध्ये तळोजा, खारघर, कळंबोली येथे घरे

  • २५ लाखांत घरं मिळवता येणार

  • सिडको लॉटरीसाठी ऑनलाइन नोंदणी उद्यापासून सुरू होणार

नवी मुंबईमध्ये हक्काचं घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या तब्बल ४७७९ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर घेता येणार आहे. १५ ऑगस्ट २०२६ म्हणजे उद्यापासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता www.cidcohomes.com या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. या वेबसाईटवरच तुम्हाला या लॉटरीसंदर्भात अधिक माहिती मिळेल.

नवी मुंबईतील तळोजा, खारघर आणि कळंबोली या प्राइम लोकेशनवर ही घरं असणार आहेत त्यामुळे या लॉटरीसाठी चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत आणि इतर सर्व शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपर्यंत असलेले आणि भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

CIDCO Lottery 2026
Dombivli : डोंबिवलीतील 29 कुटुंबांची चिंता वाढली! इमारत रिकामी करण्याची नोटीस, रहिवाशांची केडीएमसीत धाव

तळोजा, कळंबोली आणि खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे, मेट्रो सुविधा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत. सिडकोच्या लॉटरीमध्ये तळोजा सेक्टर ३९ मध्ये ४२२९ इतकी घरं आहेत. खारघर बस डेपो याठिकाणी २९३ घरं असणार आहेत. तर कळंबोली बस डेपो येथे २५७ घरं असणार आहेत. या तिन्ही ठिकाणची सर्व घरं १ बीएचके असणार असून ती ३२२ चौरस फुटांची असणार आहेत.

CIDCO Lottery 2026
CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोच्या ४,७७९ घरांसाठी लॉटरी, कुठे किती घरं अन् सोडत कधी निघणार?

सिडकोच्या लॉटरीतील घरांचे ठिकाण आणि किती घरं?

तळोजा सेक्टर-३९ - ४,२२९ सदनिका

कळंबोली बस डेपो - २५७ सदनिका

खारघर बस डेपो - २९३ सदनिका

सिडकोच्या घरांच्या किमती किती?

तळोजा सेक्टर-३९ - २५.५० लाख

कळंबोली बस डेपो - ३७.७० लाख

खारघर बस डेपो - ४३.५० लाख

CIDCO Lottery 2026
CIDCO Home : नवी मुंबईत फक्त २२ लाखात घर, सिडकोची प्राईम लोकेशनवर लॉटरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com