

ठाणे आणि नवी मुंबई मार्गावर रोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ठाणे पूर्वेतल्या कोपरी ते नवी मुंबईतल्या पटनी मार्गावर ठाणे खाडीवर नवीन ६ पदरी पूल उभारण्यात येणार आहे. या महत्वाच्या प्रकल्पासाठी एमएमआयडीएकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.
आता ठाणेकरांचा प्रवास सुरळीत होणार आहे. कारण १.४ किलोमीटर लांबीचा हा खाडी पूल सध्या ऐरोली - मुलुंड आणि कळवा खाडी पुलांवरची वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच गर्दीच्या वेळेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
नव्या प्रकल्पामध्ये ठाणे कोपरी ते नवी मुंबई पटनीच्या मार्गावर नवे ६ पदरी पूल उभारण्यात येतील. पुलाची लांबी ही १४.४ इतकी असेल. त्यामुळे ३० ते ४५ मिनिटांचा प्रवासाचा वेळ कमी होईल. ठाण्यापासून फक्त ७५० मीटर अंतरावरून या पुलाची सुरुवात होईल. हा मार्ग ठाणे स्टेशन रोडला जोडेल, तर नवी मुंबईत तो ठाणे - बेलापूर रोडला कनेक्ट होईल. यामध्ये आधुनिक केबल-स्टेड तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. २०३० पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी शक्यता आहे. हा पूल सुरु होताच ऐरोली - मुलुंड आणि कळवा पुलावरची वाहतूक कोंडी कमी होईल.
नवीन पूल ठाण्यातल्या मिठ बंदर रोडवरून (कोपरी) सुरु होणार आहे. हा भाग ठाणे स्टेशनपासून जवळपास ७५० मीटर अंतरावर असेल. पूल ठाण्याची खाडी ओलांडून नवी मुंबईतल्या ऐरोली नॉलेज सिटी रोडजवळ म्हणजेच पटनीजवळ उतरणार आहे. त्याने ठाण्यापासून ठाणे-बेलापूर रोडर पोहोचणं सोपं होणार आहे. हा पूल उभारल्यावर गर्दीच्या वेळेस ताशी १,९०० पेक्षा जास्त वाहनांची क्षमता असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.