

सध्याच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. रोजची धावपळ, दगदग आणि कमी झोपेमुळे शरीर एकदम थकून जातं. मग व्यायाम करण्यासाठी वेळच मिळत नाही. तर ४० वयोगटातल्या व्यक्तींना ब्लड प्रेशर, डायबेटीज आणि सांधेदुखी अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळेस रोजच्या रोज औषधं- गोळ्या घ्यावा लागतात. पण लाइफस्टाइलमध्ये बदल करूनही या आजारांपासून आराम मिळवता येतो हे फार कमी जणांना माहित आहे. याच संदर्भात डॉक्टरांनी महत्वाची माहिती दिली आहे.
आपण आत्तापर्यंत आयुष्यभरात कितीतरी साखर खाल्ली असेल. त्याचा परिणाम तुम्हाला खूप नंतर जाणवतो. त्यामुळे अशा कोणत्याच सवयी जास्त लावू नका ज्याने तुम्हाला भविष्यात गंभीर समस्यांना सामोरं जावं लागेल. डायबेटीज हा एक सर्वात जास्त प्रमाणात वाढणारा आजार आहे. याचा सामना लहानांपासून ते वृद्धांपर्यंत करावा लागतोय. पण तज्ज्ञांच्या मते, काही साध्या लाइफस्टाइलमधल्या बदल्यांनी तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता.
तज्ज्ञांच्या मते, डायबेटीजच्या रुग्णांनी रोज चालण्याची सवय लावली पाहिजे. किमान १५ मिनिटं चालल्याने शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी होतं.चालताना शरीरातले स्नायू अॅक्टीव्ह होतात आणि रक्तातलं ग्लुकोज शोषतात. त्यामुळे रक्तातली साखर नैसर्गिकपणे कमी होते. १५ मिनिटं चालल्यानंतर रक्तातली साखर १०७ एमजी/डीएल वरून ९६ एमजी/डीएलपर्यंत खाली जाते. त्यामुळे डायबेटीजच्या रुग्णांनी चालण्याचा पर्याय निवडला पाहिजे.
बऱ्याचदा लोक चालायला आळस करतात. त्याने पचनावरही परिणाम होतो. त्यामुळे जेवल्यावर सलग १५ मिनिटं तुम्ही चालू शकता. जेवल्यावर तुमच्या रक्तातली साखर वाढते. त्यावेळेस १० ते १५ मिनिटं चालल्यावर स्नायूंमधल्या ग्लुकोजचा वापर होतो आणि साखर आपोआप कमी होते. तसेच आहारातही बदल करणं गरजेचं आहे. बाहेरचे कोणतेही पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. त्याने वजनसुद्धा नियंत्रणात राहतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.