Mumbai Local Mega Block: गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; रविवारच्या मेगाब्लॉकबाबत रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Local Train Mega Block: मध्य आणि हार्बर रेल्वेने उद्या म्हणजेच रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द केला आहे.
Good news for mumbai citizens central harbour and western rain cancel megablock in sunday
Good news for mumbai citizens central harbour and western rain cancel megablock in sundaySaam TV

Mumbai Local Train Mega Block News

सध्या राज्यभरात गणेशोत्सव आनंदात साजरा केला जात आहे. मुंबईतही गणेशोत्वाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त घराबाहेर पडत आहेत. वीकेंड असल्याने अनेकांनी गणपती मंडळांना भेट देण्याचा बेतही आखला आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने रविवारच्या मेगाब्लॉकबाबत मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Good news for mumbai citizens central harbour and western rain cancel megablock in sunday
IMD Rain Alert: आनंदाची बातमी! राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; येत्या ४८ तासांत 'या' जिल्ह्यांना झोडपणार

गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची (Mumbai News) तारांबळ होऊ नये म्हणून मध्य आणि हार्बर रेल्वेने उद्या म्हणजेच रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण कसारा कर्जत तसेच हार्बर-ट्रान्सहार्बरसह बेलापूर-खारकोपर मार्गिकांवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेने देखील रविवारचा मेगाब्लॉक (Mega block) रद्द केला आहे. मात्र, पश्चिम मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. बोरिवली ते भाईंदरदरम्यान हा ब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनकडे (Mumbai Local Train) पाहिलं जातं. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करीत असतात. सोमवार ते शुक्रवार मध्य रेल्वेवर १ हजार ८१० लोकल फेऱ्या होतात. रविवारी सुट्टी असल्याने तीनशेहून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. मात्र आता रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या १ हजार ४७४ फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री मेगाब्लॉक जाहीर

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते भाईंदर अप आणि डाउन जलद मार्गावर शनिवारी रात्री मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत बोरिवली ते वसई विरार रोडदरम्यान धावणाऱ्या अप-डाउन मार्गावरील सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

Edited by - Satish Daud

Good news for mumbai citizens central harbour and western rain cancel megablock in sunday
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि अजितदादा भाजपच्याच तिकिटावर लढतील; बड्या नेत्याच्या भाकिताने खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com