Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच

Ghatkopar Hoarding Collapsed: घाटकोपर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी भलंमोठं होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक हे होर्डिंग कोसळले आणि पेट्रोल पंपावर असलेली वाहनं आणि अनेक जण याखाली अडकले.
Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच
Ghatkopar Hoarding Accident News UpdateSaam TV
Published On

घाटकोपर येथे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून (Ghatkopar Hoarding Case) झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला ५० तास उलटून गेले. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अजून बरेच जण आणि वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी भलंमोठं होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक हे होर्डिंग कोसळले आणि पेट्रोल पंपावर असलेली वाहनं आणि अनेक जण याखाली अडकले. या दुर्घटनेला होऊन ५० तास झाले. सकाळपर्यंत या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला होता. आता मृताचा आकडा वाढून १७ वर गेला आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेत ७५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच
PM Modi Roadshow in Mumbai : पीएम मोदी मुंबईत येणार; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग

घटनास्थळावर अजून देखील एनडीआरएफ आणि महापालिका आपत्ती सेवा, अग्निशमन दलांकडून बचाव कार्य सुरू आहे. तर आतापर्यंत ५० टक्के ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण झाले आहे. २५ दुचाकी आणि १० चारचाकी वाहनं या ढिगार्‍या खालून काढण्यात आले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी एक जोडपं आणि एक वाहन चालक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेतील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच
Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

दरम्यान, घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५ लाखांची मदत देण्यात येणार आहे. त्याचसोबत जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असून त्यांना आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.

Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच
Bhavesh Bhinde: घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर बलात्काराचा गुन्हा, खळबळजनक माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com