पीएम मोदी मुंबईत येणार; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग
PM Modi Roadshow in Mumbai : Google

PM Modi Roadshow in Mumbai : पीएम मोदी मुंबईत येणार; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग

PM Modi Roadshow in Mumbai update : महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांचा रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
Published on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान नाशिक,कल्याण आणि मुंबईमध्ये येणार आहेत. पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या प्रचारासाठी बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांचा रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या मतादानाच्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे उद्या म्हणजे १५ मे रोजी मुंबईमध्ये रोड शो होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. १५ मे रोजी रोड शोमुळे एलबीएस मार्गावरील गांधी जंक्शन ते नौपाडा जंक्शनपर्यंत मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

 पीएम मोदी मुंबईत येणार; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग
Mumbai Local Train News: लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...

त्याचबरोबर माहूल - घाटकोपर रोड मेघराज जंक्शन ते आर बी कदम जंक्शन उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद असेल. एलबीएस मार्ग आणि माहूल-घाटकोपर मार्गावरील वाहतूक दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो वरील मार्गांवर होणार असल्याने येथील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.

नवी मुंबईतही वाहतुकीत बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात वाहतूक होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापे, नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना 'प्रवेश बंद' करण्यात आला आहे. यामुळे अवजड वाहने एरोली मार्गे इच्छित स्थळी जातील.

दहीसर मोरी मार्गे कल्याण फाटा येथील कल्याणच्या दिशने जाणाऱ्या जड अवजड वाहनांना दहीसर मोरी मार्गे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल मार्गे ही वाहने इच्छित स्थळी जातील. तर नवी मुंबई, शिळफाटा, खोणीकडून नेवाळी मार्गे कल्याणकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या नाक्यावरून अंबरनाथ, बदलापूर मार्गे इच्छित स्थळी जातील, असे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com