Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या

Karjat News: कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती अमर मिसाळने सरकारी जमीन हडप केली. ही जमीन त्याने दुसऱ्याला विकली. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यानंतर मिसाळ फरार झाला होता. सात महिन्यांनंतर त्याला अटक करण्यात आली.
Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
Karjat Shocking NewSaam Tv
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई

सरकारी जमीन हडप करून ती दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याची धक्कादायक घटना कर्जतमध्ये घडली. पंचायत समितीच्या माजी सभापतीने हा प्रताप केला आहे. हे प्रकरण समोर येताच माजी सभापती अमर मिसाळ फरार झाला होता. अखेर सात महिन्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. कर्जतमधून अमर मिसाळला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार-अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर प्रकल्पासाठी विंधणे येथील शासकीय जमीन कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती अमर मिसाळने हडप केली. ही जमीन त्याने परस्पर दुसऱ्या व्यक्तीला वकिली. याप्रकरणी सात महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अमर मिसाळ फरार झाला होता.राजकीय आशीर्वादाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून बसणाऱ्या अमर मिसाळला न्हावाशेवा पोलिसांनी कर्जत येथून बेड्या ठोकल्या.

Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
Navi Mumbai: नवी मुंबईत आज पाणीबाणी, कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

अमर मिसाळने केलेला फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी मंडळ अधिकारी मनीष जोशी यांच्यामार्फत न्हावाशेवा बंदर पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०२४ मध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सात महिन्यांत याप्रकरणी १० पैकी आरोपी वेणी ब्रायन डिसोजा (बनावट गेलाराम भुरोमल), संकेत पाटील, संतोष मराठे, बोगस गेलाराम भोरॉममल, दत्ता कमदुकर, संतोष पांडे, नबिजात अन्सारी यांना अटक केली.

Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
Navi Mumbai News: चमत्कार! हार्ट अटॅकनंतर अपघात घडला, १५ मिनिटानंतर बंद पडलेलं हृदय धडधडू लागलं

जमीन हडप करणारे आणि या कटाचे मुख्य सूत्रधार हे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्ती आणि कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ आहे. अमर मिसाळला सात महिन्यांनंतर अटक करण्यात आली. राजेश नाविक, अजित भंडारी हे तिघे जण अद्यापही फरार आहेत. ते पोलिसांना सापडत नव्हते. हे तिन्ही आरोपी गेले सात महिने मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता.

Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी बातमी, पहिल्या दिवसापासून १५ शहरात उड्डाणे

विंधणे येथील सरकारी जमिनीचे मालक असल्याचे भासवून माजी सभापतीने जमिनीच्या नोंदी सातबारावर करून घेतल्या होत्या. त्यातच शासनाच्या मालकीची ही जमीन संगनमताने शासनाच्या अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी विकून शासनाचे एक कोटी ३६ लाख ६३ हजार ७०० रुपयांना चुना लावला होता. हे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. यामध्ये आता माजी सभापतीविरोधात कारवाई करण्यात आली.

Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
Karjat Farmhouse: फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची फॅक्ट्री, शेळीपालनाच्या नावाखाली व्यवसाय; पोलिस तिथपर्यंत कसे पोहचले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com