Karjat Farmhouse: फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची फॅक्ट्री, शेळीपालनाच्या नावाखाली व्यवसाय; पोलिस तिथपर्यंत कसे पोहचले?

Karjat Farmhous Raid: कर्जतमध्ये एका फार्महाऊसमध्ये ड्रग्जची निर्मिती केली जात होती. या फार्म हाऊसवर छापा टाकत पोलिसांनी तब्बल ११ कोटींचे ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली.
Karjat Farmhouse: फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची फॅक्ट्री, शेळीपालनाच्या नावाखाली व्यवसाय; पोलिस तिथपर्यंत कसे पोहचले?
Karjat Farmhous Raid Saam Tv
Published On

कर्जतमधील फार्महाऊसवरून ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. मुंबई पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांनी कर्जतमधील कशेळे हद्दीतील एका फार्महाऊसवर छापा टाकत ही कारवाई केली. आश्चर्याची बाब म्हणजे या फार्महाऊसमध्ये शेळीपालनाच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली.

मुंबई पोलिसांच्या टीमने कर्जतमध्ये मोठी कारवाई करत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील कशेळे हद्दीतील सावली फार्म हाऊसवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. या फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज फॅक्ट्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या फार्म हाऊसमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय सुरू आहे असं भासवण्यात आले होते पण याठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्जची निर्मिती केली जात होती. या प्रकरणी विक्रेत्यापासून उत्पादकांपर्यंत एकूण ६ जणांना पोलिसांनी अटक केली. तसेच जवळपास २५ कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा आणि ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य पोलिसांनी जप्त करण्यात आलं आहे.

Karjat Farmhouse: फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची फॅक्ट्री, शेळीपालनाच्या नावाखाली व्यवसाय; पोलिस तिथपर्यंत कसे पोहचले?
Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, ड्रग्ज देऊन बलात्कार, टोळीनं तरूणींचे प्रायव्हेट VIDEO शेअर करत..

मुंबईतील पूर्व उपनगर नशामुक्त करण्यासाठी विशेष अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी या पथकाची स्थापना केली. एका ड्रग्ज प्रकरणात कर्जत येथे एमडी ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कर्जत गाठले. कर्जतमधील सावली फार्महाऊसवर त्यांनी छापा टाकला. शेळी पालनाचा व्यवसाय असल्याचे दाखवून याठिकाणी ड्रग्ज तयार केले जात होते.

Karjat Farmhouse: फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची फॅक्ट्री, शेळीपालनाच्या नावाखाली व्यवसाय; पोलिस तिथपर्यंत कसे पोहचले?
Nagpur : एमडी ड्रग्ज खरेदी विक्री करणारे तिघे ताब्यात; नागपूरच्या मानकापूर पोलिसांची कारवाई

पोलिसांनी या फार्म हाऊसमधील हालचालींवर नजर ठेवत माहिती काढली. त्यानंतर या फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला. फार्म हाऊसमध्ये एक फॅक्टरी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तिथून ११ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याचसोबत एकूण २५ कोटींचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे एक कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आणखी ५ जणांना अटक केली.

Karjat Farmhouse: फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची फॅक्ट्री, शेळीपालनाच्या नावाखाली व्यवसाय; पोलिस तिथपर्यंत कसे पोहचले?
Mumbai Crime: मुंबईत ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश,पोलिसांनी उघडकीस आणली १३ कोटींची तस्करी

मुंबई पोलिसांनी मार्च महिन्यात चेंबूरमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडे ४५ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. ड्रग्ज त्या तरुणापर्यंत कसे आले याचा तपास पोलिसांनी सुरु केला होता. त्यानंतर ड्रग्ज विक्रेत्यापासून ते पुरवठादारांपर्यंत ते पोहोचले. पुढे मग तस्करी करणाऱ्यांपासून ड्रग्जची निर्मिती करणाऱ्यांपर्यंत ते पोहोचले. सध्या या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Karjat Farmhouse: फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची फॅक्ट्री, शेळीपालनाच्या नावाखाली व्यवसाय; पोलिस तिथपर्यंत कसे पोहचले?
Delhi Mumbai Expressway: अक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालेल्या हायवेवर 'या 'चुका करू नका, नाहीतर बनेल Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com