Nagpur : एमडी ड्रग्ज खरेदी विक्री करणारे तिघे ताब्यात; नागपूरच्या मानकापूर पोलिसांची कारवाई

Nagpur News : नागपूरच्या मानकापूर परिसरात बुद्धविहाराजवळ एमडी पावडरची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

पराग ढोबळे 

नागपूर : एमडी ड्रग्स प्रकरणी अनेकदा कारवाया झाल्या आहेत. अशात नागपूरच्या मानकापूर परिसरात एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या तीन जणांना मानकापूर पोलिसांनी अटक केली. त्याचजवळून २० ग्रॅम एमडीसह, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात येत आहे. 

नागपूरच्या मानकापूर परिसरात बुद्धविहाराजवळ एमडी पावडरची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत पोलिसांनी एमडी पावडरची विक्री करताना आयुष मेश्रामची अंग झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ 20 ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आले. यानंतर अधिक चौकशी केली असता आणखी साथीदार असल्याची माहिती मिळाली.

Nagpur News
Ganpati Idol Export : गणपती बाप्पा निघाले परदेशी; पेणमधून ७ हजार मुर्त्या रवाना

तिघेजण ताब्यात 

तर एमडी ड्रग्स खरेदी करणारे वर्ध्याचे असून खरेदीसाठी आलेल्या दोघजवळून रोख रक्कम मिळून आली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा प्रकारे सदरच्या कारवाईत पोलिसांनी त्यानुसार बवसीम अहमद खान, कार्तिक बिडवाड आणि आयुष मेश्राम या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान हे ड्रग कुठून विक्रीसाठी आले. याचा शोध पोलीस घेत आहे.

Nagpur News
Shirdi : धमकीच्या मेलनंतर साई संस्थान अलर्ट; दर्शनरांग प्रवेशद्वारावर कसून तपासणी

गांजा बाळगणारा इसम पोलीसांच्या ताब्यात 
बीडच्या माजलगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहीतीच्या आधारे माजलगांव शहरातील जुना मोंढा परीसरातील तुळजाभवानी दुध डेअरी समोर रोडवर गंगाधर पंढरीनाथ नाटकर (वय ५०) याचेवर काल रात्री ८:१५ वाजता छापा मारत कारवाई केली आहे. तर त्याच्या ताब्यातुन विक्री करण्यासाठी आणलेला १९२ ग्रॅम ७ हजार ६८० रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com