Shirdi : धमकीच्या मेलनंतर साई संस्थान अलर्ट; दर्शनरांग प्रवेशद्वारावर कसून तपासणी

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल २ मे रोजी प्राप्त झाला आहे. मेल मिळाल्यानंतर साई संस्थानसह पोलीस यंत्रणा अलर्ट
Shirdi News
Shirdi NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 
शिर्डी
: शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर साई संस्थान अलर्ट झाले आहे. येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यापूर्वी प्रत्येकाची प्रवेशद्वारावर कसून तपासणी केली जात आहे. कुठलीही संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही याची काळजी घेतली जात असून पोलीस यंत्रणा देखील साई मंदिर परिसरात गस्त घालताना दिसत आहे. 

शिर्डीच्या साईबाबा संस्थानला साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल २ मे रोजी प्राप्त झाला आहे. हा मेल साई संस्थानला २ मे रोजी सकाळीच प्राप्त झाला असून धमकीचा मेल मिळाल्यानंतर साई संस्थानसह पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तसेच साई मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेतही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान हा धमकीचा मेल नेमका कुणी पाठवला, याबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे

Shirdi News
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदीरात बोगस व्हीआयपींना आता दर्शन बंदी; वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने निर्णय

पोलीस व मंदिर प्रशासन अलर्ट

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. यानंतर साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून मंदिर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. याठिकाणी आलेल्या भाविकांची कसून तपासणी केली जात आहे.   

Shirdi News
Ganpati Idol Export : गणपती बाप्पा निघाले परदेशी; पेणमधून ७ हजार मुर्त्या रवाना

मेलबाबत अद्याप तपास सुरु 

साई मंदिरात दर्शनासाठी हजारोच्या संख्येने रोज भाविक येत असतात. अशा ठिकाणी सुरक्षिततेची दखल घेतली जात असते. अशातच धमकीचा मेल आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त आहे. प्रवेशद्वारावरच भाविकांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान धमकीचा आलेला मेल खोडसाळपणा की आणखी काही याबाबत यंत्रणा तपास करत असून साई संस्थान अलर्ट मोडवर दिसून येत असली तरी पोलीस प्रशासनाकडून अद्याप याचा तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com