Ganpati Idol Export : गणपती बाप्पा निघाले परदेशी; पेणमधून ७ हजार मुर्त्या रवाना

Raigad News : गणेश उत्सवाला अजून बराच कालावधी बाकी असला तरी गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेशोत्सवा पूर्वीची लगबग सुरु झाली आहे. पेणमधील गणेश मुर्तींना परदेशातही मोठी मागणी
Ganpati Idol Export
Ganpati Idol ExportSaam tv
Published On

सचिन कदम 
पेण (रायगड)
: गणेशोत्सवाला अजून चार- पाच महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र यापूर्वीच लाडके गणराया परदेश वारीला निघाले आहेत. परदेशात राहत असलेल्या भारतीयांकडून त्याठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून यासाठी पेणमधून ७ हजार गणेशमूर्ती ऑस्टेलिया, दुबई, साउथ आफ्रीका, वेस्टइंडीज, कॅनडाकडे रवाना करण्यात आले आहेत.

गणेश उत्सवाला अजून बराच कालावधी बाकी असला तरी गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेशोत्सवा पूर्वीची लगबग सुरु झाली आहे. केवळ महाराष्ट्र, देशात नव्हे तर पेणमधील गणेश मुर्तींना परदेशातही मोठी मागणी असते. पेणमधुन प्रतीवर्षी लाखोच्या संख्येने गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात. या वर्षी या मागणीत वाढ झाली असून पेणमधुन गणेश मुर्ती परदेशात रवाना होण्यास सुरुवात झाली आहे.  

Ganpati Idol Export
Nandurbar : दुदैवी घटना! महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॉलाचा विद्युत तारांना स्पर्श, चालकाचा होरपळून मृत्यू

दरवर्षी हजारोंच्या संख्येने मूर्ती रवाना 

पेणमधील गणपती मूर्तीना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्या अनुषंगाने पेणमधून आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, दुबई, साउथ आफ्रीका, वेस्टइंडिज, कॅनडा आदी देशात हजारोच्या संख्येत गणेश मुर्ती पाठवण्यात आल्या आहेत. यंदाच्या उत्सवासाठी पहिल्या टप्पात ७ हजार गणेश मूर्तींची रवानगी करण्यात आली आहे. यानंतर देखील मागणीनुसार गणेश मूर्तींची रवानगी करण्यात येणार आहे. 

Ganpati Idol Export
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदीरात बोगस व्हीआयपींना आता दर्शन बंदी; वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने निर्णय

७ फुटापर्यंत गणेश मूर्ती 

पेणमधून पाठविण्यात आलेल्या गणेश मूर्तींमध्ये १ फुटापासून ते ७ फुटांपर्यंतच्या गणेश मुर्तीं असून यामध्ये कापडी फेटा, कापडी धोतर, शेला यासह डायमंड, इमेटेशन ज्वेलरी असणाऱ्या गणेश मूर्तींना परदेशातील अनिवासी भारतीयांकडून मोठी मागणी पहायला मिळत आहे. तशाच आकर्षक गणेश मूर्ती पाठविण्यात येत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com