Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदीरात बोगस व्हीआयपींना आता दर्शन बंदी; वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने निर्णय

Dharashiv News : मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीच्या ठिकाणी काहीजण झटपट दर्शन घेऊ इच्छितात. अशांसाठी पासची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली असते
Tuljabhavani Temple
Tuljabhavani TempleSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : देवदर्शनाला गेल्यानंतर भाविकांना त्याठिकाणी तात्काळ दर्शन घेता यावे; यासाठी व्हीआयपी पास दर्शनाची सुविधा आहे. मात्र अनेक ठिकाणी यात काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. अर्थात बोगस व्हीआयपी दर्शन पास देण्याचा धंदा पाहण्यास मिळतो. मात्र अशा पद्धतीने बोगस व्हीआयपी पास घेऊन येणार्यांना आता थेट दर्शन बंदी करण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. 

मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीच्या ठिकाणी काहीजण झटपट दर्शन घेऊ इच्छितात. अशांसाठी सशुल्क पासची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली असते. तर व्हीआयपी दर्शनाची देखील व्यवस्था असते. मात्र यात गैरप्रकार होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशाच प्रकारे तुळजाभवानी मंदिरात देखील व्हीआयपी दर्शन व्यवस्था असून यात गैरप्रकार होत असतात. 

Tuljabhavani Temple
Yewla Crime : कोळम वस्तीवर सशस्त्र दरोडा; घरातील महिला- पुरुषांना जबर मारहाण करत दरोडेखोरांनी ऐवज लांबविला

भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोप 

तुळजाभवानी मंदीरात व्हीआयपी पास वाटपावरून अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने मंदीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंदीर प्रशासनाकडुन यापुर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील ख्यातमान व्यक्तींना पास देण्यात येत होत्या. मात्र यामध्ये काही राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांना देखील पास देण्यात येत असल्याची चर्चा होत्या. तसेच व्हिआएपी दर्शन पासमध्ये भ्रष्ट्राचार केला जात असल्याच्या तक्रार खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी केली होती.  

Tuljabhavani Temple
Nandurbar : दुदैवी घटना! महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॉलाचा विद्युत तारांना स्पर्श, चालकाचा होरपळून मृत्यू

सशुल्क दर्शन पास उपलब्ध 

या वाढत्या तक्रारींमुळे आता बोगस व्हीआयपींना दर्शन पास न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांसाठी दोनशे, पाचशे रुपयांचे सशुल्क दर्शनाचे पास उपलब्ध आहे. आमदार, माजी आमदार, राज्य सरकारमधील विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी यांना मंदीर संस्थानने व्हिआएपी दर्शनाची सोय ठेवली आहे. मात्र कोणीही व्हिआएपी आहे; असे सांगणाऱ्यांना मात्र व्हिआएपी दर्शनाची संधी मिळणार नाही; अशी माहीती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com