Thane Crime : ठाण्यातील अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाचा शीर नसलेला मृतदेह, शहरात खळबळ; पोलिसांनी व्यक्त केला वेगळाच संशय

Thane Murder News : ठाण्यातील अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. नालिंबी रोडवरील तीन झाडांजवळ हा मृतदेह सापडला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Ambernath Body of an unknown person found
Ambernath Body of an unknown person foundSaam Tv News
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही

ठाणे : ठाण्यातील अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. नालिंबी रोडवरील तीन झाडांजवळ हा मृतदेह सापडला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेह टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला असून याबाबतची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास हा अज्ञात इसम मद्यपान करण्यासाठी आला असावा आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज यानंतर व्यक्त होत आहे. दरम्यान, या इसमाचं शीर अजून सापडलेलं नसून त्याची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

नाशिकमध्ये मद्यधुंद टवाळखोरांचा हल्ला

दरम्यान, नाशिकमध्ये मद्यधुंद टवाळखोर तरुणांनी दुकानावर आणि घरावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय. दहशत माजवण्यासाठी या टवाळखोरांनी दुकानावर आणि घराच्या सेटरवर कोयत्याने हल्ला केला. ही घटना शहरातील सिडको उत्तम नगरात घडलीय.

Ambernath Body of an unknown person found
Vaishnavi Hagawane : ...अन् तेव्हा त्यांची थेट सरकारी वकिलांना मारहाण; हगवणेंचे वकील दुशिंग यांची कुंडली समोर

नाशिकमधील सिडको उत्तम नगरमधील गौरीशंकर मंगल कार्यालय समोरील फर्निचरच्या दुकानावर कोयत्याने हल्ला केला. दोन्ही तरुण हे दारुच्या नशेत होते. दहशत माजवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा हल्ला केलाय. हल्लाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान, नाशिकमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

तर पंचवटीतील बुधवारच्या भाजीपाला बाजारात खरेदीसाठी आलेल्या मुलाचा काही सराईतांनी पैशावरून मुद्दाम वाद घालत एका तरुणाला त्याच्या वडिलांसमोर बेदम मारहाण केली. यात अतिरक्तस्त्राव झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. गाडगे महाराज पुलावर सर्वांदेखत हा प्रकार घडला. या घटनेने नागरिक भयभीत झालेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा सीतागुंफा रोडवरील परदेशी भवनात राहत होता. त्याचे नाव नंदलाल ऊर्फ सूरज जगनकुमार दास (वय १९) असं आहे.

Ambernath Body of an unknown person found
Vaishnavi Hagawane Case : पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, वैष्णवीचे वडील म्हणाले नाईलाजानं मला मुलीचं लग्न करावं लागलं, आणि...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com