Navi Mumbai News: चमत्कार! हार्ट अटॅकनंतर अपघात घडला, १५ मिनिटानंतर बंद पडलेलं हृदय धडधडू लागलं

Man Survived Despite Heart Beat Stop : अनिकेत नलावडे यांना गाडी चालवताना हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांचा अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला.
Navi Mumbai News
Man Survived Despite Heart Beat Stop
Published On

विकास मिरगणे

हल्ली हृदयविकारचा झटका येण्याचे प्रमाण वाढलंय. कोणालाही आणि कधीही हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना आपण पाहिल्यात. हृदयाचं धडधडनं बंद पडलं की हार्ट अटॅकचा झटका येतो त्यात अनेकांचा मृत्यू होत असतो. परंतु नवी मुंबईतील तळोजामध्ये एक चमत्कार घडलाय. कार चालवताना एका ३२ वर्षीय युवकाला हार्ट अटॅकचा झटका आला, त्यानंतर त्याचा अपघात झाला.

पंधरा मिनिटे कार चालकाच हृदय बंद होतं, पण देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ना, तसाच प्रकार या युवकासोबत घडला. बंद पडलेलं हृदय तब्बल १५ मिनिटांनी धडधडू लागल्यानं डॉक्टरही आर्श्चचकित झालेत.

Navi Mumbai News
CM Fadnavis: देशाला पाकव्याप्त काश्मीरचा नाहीतर पाक काबूत काँग्रेसचा धोका: मुख्यमंत्री फडणवीस

अनिकेत नलावडे, असं या ३२ वर्षीय युवकाचं नाव आहे. नलावडे याचे ह्रदय चक्क 15 मिनिटे बंद पडले होते. मात्र, सुदैवाने रुग्णालयात ते पुन्हा धडधड लागले. कार चालवताना हार्ट अटॅक आल्याने अपघात झाल्याची घटना तळोजा येथे घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. या अपघात एक चमत्कारिक गोष्ट घडली. कार चालवताना अनिकेत नलावडेला हर्ट अटॅक आला. त्याचे हृदय आणि बीपी 15 मिनिटांपर्यंत बंद होते, ईश्वरी चमत्कारने अनिकेत नलावडे जिवंत राहिलेत.

Navi Mumbai News
Nandurbar : मजुरी करून परत येताना वाटेतच प्रसूती वेदना; बसस्थानकातच महिलेची प्रसूती

अनिकेत नलावडे हे घरी असताना त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर अनिकेत नलावडे आपल्या पत्नीला घेऊन कार चालवत हॅास्पीटलला जाण्यास निघाले. पण कळंबोली जवळ पोहोचताच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांनी बाईकस्वराला उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला .

यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. गाडीत अडकलेल्या अनिकेत नलावडे यांना बाहेर काढून कळंबोली येथील व्हाईट लोटस रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोचल्यानंतर डॅाक्टरांनी तपासले असता त्यांचे हृदय आणि बीपी पुर्णपणे बंद झाले होते. जवळपास मृत्युच्या दाडेत अनेक नलावडे पोचले होते. मात्र नामवंत हृदयरोगतज्ञ डॅा विजय डीसूजा यांनी त्वरीत उपचाराला सुरूवात करत पुढील एक तासात अनिकेत नलावडे यांना शुध्दीवर आणून त्यांचे प्राण वाचविले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com