Nandurbar : मजुरी करून परत येताना वाटेतच प्रसूती वेदना; बसस्थानकातच महिलेची प्रसूती

Nandurbar Taloda News : २० वर्षीय मातेची प्रसूती तळोदा बसस्थानकात रस्त्यातच झाल्याची घटना घडली. समशेरपूर येथे शेंगा काढण्याच्या मजुरी कामासाठी गेलेले कुटुंब परत सूर्यपूरकडे जाण्यासाठी निघाले होते
Nandurbar Taloda News
Nandurbar Taloda NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींना येणाऱ्या समस्या अजूनही कमी झालेल्या नाहीत. दरम्यान मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या आदिवासी बांधव रोज मजुरीला जातात. अशाच प्रकारे नऊ महिन्यांची गरोदर असलेली महिला मजुरीच्या कामासाठी शेतात गेली असताना घरी परतताना रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्या. रुग्णालयात नेण्यास कोणतेही साधन नसल्याने बसस्थानकातच ताडपत्रीचा आडोसा करत प्रसूती करण्याची वेळ कुटुंबावर आली. 

धडगाव तालुक्यातील सूर्यपूर गावातील एका २० वर्षीय मातेची प्रसूती तळोदा बसस्थानकात रस्त्यातच झाल्याची घटना घडली आहे. समशेरपूर येथे शेंगा काढण्याच्या मजुरी कामासाठी गेलेले कुटुंब काम आटोपून परत सूर्यपूरकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान तळोदा बसस्थानकात त्यांनी वाहन थांबवून बाजारासाठी थोडा वेळ थांबण्याचे ठरवले. याच दरम्यान गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या.

Nandurbar Taloda News
Amalner Crime : लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने तहसील कार्यालयात नेले; महिलेचे दागिने घेऊन पसार

प्रसूतीसाठी ताडपत्रीचा आडोसा 
प्रसंग गंभीर बनताच सोबत असलेल्या महिलांनी ताडपत्रीचा आडोसा उभा करून प्रसूतीसाठी तयारी केली. तातडीने मदतीसाठी तळोदा शहरातील युवक राहुल जैन, संदीप उदासी आणि बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक विनोद जावरे पुढे सरसावले. जावरे यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधून १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. प्रसूतीनंतर आदिवासी महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Nandurbar Taloda News
Panchganga River Flood : मान्सूनपूर्व पावसात पंचगंगा नदीला पूर; राजाराम बंधाऱ्यावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद

आरोग्य सुविधांचा प्रश्न कायम 
दरम्यान बसस्थानक आवारात प्रसूती झाल्याची घटना घडल्यानंतर सदर घटना एकीकडे धैर्याची प्रेरणादायक कहाणी ठरत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि प्रसूतीसाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या सेवांचा अभाव अधोरेखित करत आहे. अर्थात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा असलेला त्रास अजूनही थांबलेला नसल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com