Amalner Crime : लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने तहसील कार्यालयात नेले; महिलेचे दागिने घेऊन पसार

Jalgaon News : स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभ्या असताना तेथे एक जण आला. त्याने महिलेला बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजारांप्रमाणे ८० हजार रुपये काढून देत असल्याचे सांगितले
Amalner Crime
Amalner CrimeSaam tv
Published On

अमळनेर (जळगाव) : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला फूस लावून बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपयांचा लाभ मिळवून देण्याचे सांगत तहसील कार्यालयात घेऊन गेला. मात्र कार्यालयाबाहेर अंगावरील दागिने काढून घ्या असे सांगत या दाम्पत्याकडील दागिने घेऊन पसार झाल्याची घटना अमळनेर येथे उघडकीस आली आहे. दांपत्याजवळून ४५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहे. 

अमळनेर तहसील कार्यालयाच्या बाहेर सदरची घटना घडली आहे. सदर घटनेत अशरफबी फकीर मोहंमद शेख या पतीसोबत पुतणीच्या लग्नासाठी अमळनेरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभ्या असताना तेथे एक जण आला. त्याने महिलेला बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजारांप्रमाणे ८० हजार रुपये काढून देत असल्याचे सांगितले. यावर दाम्पत्याने विश्वास ठेवला. 

Amalner Crime
Nagpur Crime : नागपुरात हत्येचे सत्र सुरूच; जुन्या वादातून तरुणाची भरचौकात हत्या

रिक्षातून नेले तहसील कार्यालयात 

यानंतर रिक्षामध्ये बसवून त्यांना तहसील कार्यालयात घेऊन गेला. येथे पोह्चल्यानंतर तहसीलच्या बाहेर झाडाच्या आडोशाला घेऊन जात अंगावरील दागिने काढून घ्या, नाही तर पैसे मिळणार नाहीत’, असे त्याने सांगितले. त्यावरून महिलेने तिच्या अंगावरील १४ हजारांचे सोन्याचे टोंगल, १४ हजारांची पांचाळी, १५ हजारांचे चांदीचे वाळे व दीड हजाराचा मोबाईल पिशवीत काढून ठेवला. यानंतर फकीर शेख यांना तहसील कार्यालयात घेऊन गेला. बाहेर येत काकांचे ४० हजार रुपयांचे काम झाले असून तुम्हीही चला म्हणून सांगत महिलेला घेऊन गेला. 

Amalner Crime
Jalgaon : मान्सूनपूर्वीच ७ कृषी परवाने निलंबित; पथकाच्या तपासणीत अनियमिततेसह नियमांचे उल्लंघन

दागिन्यांची पिशवी घेऊन झाला पसार 

दरम्यान महिलेने सोन्या-चांदीचे दागिने असलेली पिशवी पतीजवळ दिली. महिलेला घेऊन तो तहसील कार्यालयात गेला आणि तेथूनआधार कार्डची झेरॉक्स काढून आणा, असे सांगितले. तोपर्यंत तो फकीर शेख यांच्याकडे आला व अशरफबी यांनी पिशवी मागितल्याचे सांगत दागिन्यांची पिशवी घेऊन पसार झाला. दरम्यान बराच वेळ झाल्यानंतर देखील इसम आला नसल्याने महिलेने पतीजवळ येत तपस केला. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत अशरफबी शेख यांनी अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल करत गुन्हा दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com