Nagpur Crime : नागपुरात हत्येचे सत्र सुरूच; जुन्या वादातून तरुणाची भरचौकात हत्या

Nagpur News : दोन दिवसांपूर्वी त्याचा वनदेवी नगरातील शेख शादाब शेख शहजाद, मोहम्मद सादिक अन्सारी आणि नौशाद शेख शहजाद यांच्याशी वाद झाला होता. दोघांनीही एकमेकांना धमक्या दिल्या होत्या
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूर शहरात देखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीमध्ये वावरत आहे. यात काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच नागपूर शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. जुन्या वादातून एका तरुणाची भर चौकात शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वनदेवीनगर चौकात ही घटना घडली आहे. यात सोहेल चंद असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शेख शादाब शेख शहजाद, मोहम्मद सादिक अन्सारी आणि नौशाद शेख शहजाद असे अटकेतील आरोपीचे नावे आहेत. मृत सोहेल हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याचा वनदेवी नगरातील शेख शादाब शेख शहजाद, मोहम्मद सादिक अन्सारी आणि नौशाद शेख शहजाद यांच्याशी वाद झाला होता. दोघांनीही एकमेकांना धमक्या दिल्या होत्या. 

Nagpur Crime
Sarangkheda Police : दुचाकीवर छुप्या पद्धतीने गांजा तस्करी; सारंगखेडा पोलिसांची कारवाई, एकाला घेतले ताब्यात

चौकात गाठत केले वार 

दरम्यान सोहेल चंद हा वनदेवीनगर चौकात उभा असताना तिघे संशयित आरोपी तेथे पोहोचले. यानंतर त्यांनी सोहेल याच्या धारदार शस्त्राने वार केला. अचानक वार झाल्याने सोहेल हा रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपी तेथून फरार झाले. दरम्यान घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. 

Nagpur Crime
Unseasonal Rain : अवकाळीने झोडपले; सोलापूर जिल्ह्यात १४२ गावात फटका, जालना, बीडमध्ये प्रचंड नुकसान

अवघ्या काही तासात मारेकरी ताब्यात 

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमी सोहेल याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सोहेलला मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी लागलीच तपासाला सुरवात करत शोध मोहीम राबवून अवघ्या काही तासांतच तीनही मारेकरी असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान नागपुरात वाढत्या गुन्हेगारीने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com