Unseasonal Rain : अवकाळीने झोडपले; सोलापूर जिल्ह्यात १४२ गावात फटका, जालना, बीडमध्ये प्रचंड नुकसान

Maharashtra Weather : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे
Unseasonal Rain
Unseasonal Rainsaam tv
Published On

अवकाळी पावसाने मागील पंधरा- वीस दिवसांपासून अक्षरशः झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून यात आर्थिक हानी होण्यासोबतच जीवितहानी देखील झाली आहे. यात सोलापूरसह जालना, बीड, वाशीम जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात मोठी हानी 

सोलापूर जिल्ह्यात १ ते २२ मे या कालावधीत ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मान्सूनपूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील १४२ गावात नुकसान झाले आहे. अर्थात आर्थिक हानी होण्यासोबतच वीज पडून दोन व्यक्तींचा तर ५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार में महिन्यात एकूण ८० घरांची पडझड झाली असून १५५७ शेतकऱ्यांचे ६३० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, आंबा यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain
Bhandara Accident : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; धान्य खरेदीसाठी जाताना व्यापाऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यात अति मुसळधार पाऊस.
बीड
: बीडच्या आष्टी तालुक्यातील बेलगाव, मांडवा, ब्रह्मगाव कडा व आष्टी परिसरात गुरुवारी दुपारी जोरदार मुसळधार पाऊस होऊन शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा मे महिन्यातच गेल्या पाच ते सहा दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला असून खरिपाच्या पेरण्याला अवधी असताना शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. तसेच नदी, नाले अवकाळी पावसाने ओसंडून वाहायला लागले असून शेताच्या ताली फुटून शेती मालासह शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

Unseasonal Rain
Sarangkheda Police : दुचाकीवर छुप्या पद्धतीने गांजा तस्करी; सारंगखेडा पोलिसांची कारवाई, एकाला घेतले ताब्यात

वादळी वाऱ्यामुळं सौर पॅनलचे नुकसान

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील उकिरखेडा परिसरात झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे व्यंकटी गणपत आवले या शेतकऱ्याच्या शेतातील कृषीपंपाच्या सौर पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही सौर प्लेट तुटून पडल्या, तर काही फुटल्या आहेत. सौरपंप शेतात लावल्यानंतर पुढील पाच वर्ष दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे दायित्व शासनाने कंपनीकडे निश्चित केले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने हे सौर पॅनल बदलून द्यावे; अशी मागणी आवले यांनी मागणी आली आहे.

संत्रा उत्पादक संकटात
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या मृग बहाराला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मृग बहर घेण्यासाठी आपल्या संत्रा बागांना तानावर सोडले होते. मात्र, सततच्या पावसामुळे हे ताणचक्र बिघडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com