CM Fadnavis: देशाला पाकव्याप्त काश्मीरचा नाहीतर पाक काबूत काँग्रेसचा धोका: मुख्यमंत्री फडणवीस

CM Devendra Fadnavis in Kolhapur : इंचलकरजीमध्ये विकासकामांचे उद्घाटन करताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
CM Devendra Fadnavis  File Pic
Devendra Fadnavissaam tv
Published On

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे उद्धघाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल हे पंतप्रधान मोदींनी दाखवलं. पहलगाम हल्ल्यात पर्यटकांवर हल्ल्याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र काँग्रेस पक्षाने पहलगाम हल्ल्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करत त्यांना प्रश्न केली. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

एक आमदार राहुल आवाडे अडीच किलोमीटर तिरंगा यात्रा काढतात तर दुसरे राहुल गांधी विमान कशी पडली. हल्ले कसे झाले, असे प्रश्न करतो. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आपल्याला धोका नाहीये, तर पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका असल्याची टीका फडणवीस यांनी केली. ज्यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसलाय. त्यांना समजावेल कोण?

CM Devendra Fadnavis  File Pic
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! १ लाख बहिणींचा लाभ होणार बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगिनींच्या सिंदूरचा बदला घेतला. मसूद अहमद, सईद यांच्या परिवारासोबत 100 आतंकवाद्यांना पंतप्रधान मोदींमुळे कंठस्थान घालण्यात यश आलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीमध्ये केलं. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिकच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमावेळी फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

काँग्रेसचे विचार हे पाकिस्तानने हायजॅक केलेत. या मूर्खांना माहीत नाही शेतीचे ड्रोन आणि युद्धाचे ड्रोन वेगळ्या असतात, या मूर्खांना आता कोण समजावेल. काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानचा व्हायरस आहे. त्यांचा हार्ड डिस्क करप्ट केलाय. हा नवा भारत आहे भगिनींचे सिंदूर पुसलं तर आम्ही घरात घुसून मारू असे फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis  File Pic
Devendra Fadnavis: फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता शेतरस्त्याची नोंद सातबाऱ्यावर होणार

700 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना’ व ‘श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने’च्या लाभर्थ्यांना मंजुरी पत्रांचे तसेच बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना विकासकामांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणाऱ्या आ. डॉ. राहुल आवाडे यांचे अभिनंदन केलं. इचलकरंजी मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टींना तात्काळ मान्यता दिल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com