Graduate Teachers Constituency Election: मोठी बातमी! पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

Graduate And Teachers Constituency Election Update: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान पार पडणार आहे.
 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक
Graduate And Teachers Constituency ElectionYandex

गणेश कवडे साम टीव्ही, मुंबई

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक (Election Commission) जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान पार पडणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत.

राज्यात चार जागांसाठी निवडणूक जाहीर ( Graduate And Teachers Constituency Election) करण्यात आली आहे. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे. १० जून रोजी मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे.

१० जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १३ जून रोजी मतमोजणी पार पडणार असल्याची (Graduate Teachers Constituency Election Update) माहिती मिळत आहे. १८ जूनअगोदर मतदानाची संपूर्ण प्रकिया पार पडणार आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडाल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक पार पडणार आहेत. आज या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे.

 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक
Voting Awareness : मतदान जनजागृतीसाठी गुरुजी बनले वासुदेव; भक्तीगीतांच्या माध्यमातून पटवताय मतदानाचे महत्त्व

राज्यात सगळ्यांचं लक्ष पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Teacher Constituency Election Update) निवडणुकांकडे लागलेलं होतं. यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे. १० जुन रोजी या निवडणुकांचा धुराळा आता उडणार आहे. या चार मतदारसंघात कोण बाजी मारणार हे, पाहावे लागणार आहे. सर्वांचं लक्ष आता या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांकडे लागलेलं आहे.

 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक
Lok Sabha Voting: मतदान केंद्रापासून 100 मीटरवर असताना जागीच कोसळले! मतदानासाठी जात असतानाच काळाचा घाला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com