Lok Sabha Voting: मतदान केंद्रापासून 100 मीटरवर असताना जागीच कोसळले! मतदानासाठी जात असतानाच काळाचा घाला

Lok Sabha Voting News: मतदान केंद्रापासून केवळ शंभर मीटर अंतरावर असताना प्रकाश चिनकटे रस्त्यात कोसळले. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.

रायगड : मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पायी जात असताना एका मतदाराचा मृत्यृ झाला. प्रकाश चिनकटे असे मयत मतदाराचे नाव आहे. प्रकाश चिनकडे हे महाड तालुक्यातील दाभेकर कोंड किंजळोली येथील रहिवाशी आहेत. मतदान केंद्रापासून केवळ शंभर मीटर अंतरावर असताना प्रकाश चिनकटे रस्त्यात कोसळले. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय. यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे चिनकटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एकीकडे संपूर्ण राज्यभरात तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे मतदारांनाही आरोग्याची काळजी घेत, उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करत मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं जातंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com